Liquor Home Delivery News : लवकर आता घरपोच दारु  (Liquor Home Delivery) देखील मिळणार आहे. कारण दारु उद्योगाला चालना देण्यासाठी दारुची होम डिलिव्हरी करण्यात येणार आहे. झोमॅटो (Zomato), स्विगी (Swiggy) आणि बिग बास्केट या प्लॅटफॉर्मनेही यासाठीची तयारी सुरु केली आहे. दारुच्या होम डिलिव्हरीच्या पार्श्वभूमीवर देशातील सहा राज्यांनी प्रोजेक्टवर काम देखील सुरु केलं आहे. दरम्यान, हा निर्णय दारु उद्योगासाठी गेमचेंजर ठरण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. 


दिल्लीतील लोकांना लवकरच दारूची होम डिलिव्हरी मिळणार


दिल्लीतील लोकांना लवकरच दारूची होम डिलिव्हरी मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीत झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केट या प्लॅटफॉर्मने यासाठीची तयारी केली आहे. मात्र, ही व्यवस्था लवकरच संपूर्ण देशातील दारु उद्योगासाठी गेम चेंजर ठरणार आहे. त्यासाठी सहा राज्यांनीही नियोजन सुरू केले आहे. दरम्यान, आर्थिक दृष्टिकोनातून विचार केल्यास विविध राज्यांच्या सरकारसाठी ही एक अनुकूल व्यवस्था आहे. कारण त्यांच्या उत्पन्नाचा मोठा हिस्सा दारुवरील करातून येतो. देशात जर पेट्रोल, अन्न, रेशन, औषध, कपडे आणि शूजची होम डिलिव्हरी दूरच्या ठिकाणी केली जात असेल, तर तिथे दारुची होम डिलिव्हरी होऊ शकते. दिल्लीत ही व्यवस्था लवकरच सुरु होणार आहे. मात्र, उर्वरित 6 राज्येही त्यावर लक्ष ठेवून आहेत.


मद्य उद्योगासाठी गेमचेंजर ठरणार


झोमॅटो, स्विगी आणि बिग बास्केट सारख्या डिलिव्हरी प्लॅटफॉर्मने दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी करण्याची तयारी केली आहे. आता कोविड संपल्यानंतर जवळपास 3 वर्षांनी लोकांच्या या गरजेला ठोस स्वरुप मिळणार आहे. हे संपूर्ण मद्य उद्योगासाठी गेम चेंजर देखील असू शकते. कारण यामुळं मद्य व्यवसाय वाढण्याला चालना मिळणार आहे. दरम्यान, कोरोना संकटाच्या काळात देखील दारुची घरपोच डिलीव्हरी केली जावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली होती.


कोणकोणत्या राज्यांनी केली तयारी?


दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत लवकरच दारुची होम डिलीव्हरी केली जाणार आहे. प्रथम ते प्रायोगिक तत्त्वावर हे सुरु केले जाईल. दिल्ली व्यतिरिक्त कर्नाटक, हरियाणा, पंजाब, तामिळनाडू, गोवा आणि केरळ या राज्यांनीही यावर पायलट प्रोजेक्ट सुरू करण्याची योजना आखली आहे. कोविडच्या काळात, अशी कल्पना प्रथम केरळ आणि कर्नाटकमध्ये मांडण्यात आली होती. परंतू त्यानंतर ती अंमलात आणता आली नाही.


महत्वाच्या बातम्या:


Pune Crime News: गावठी हातभट्टीची दारु तयार करणारा ताब्यात; पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची कारवाई