Travel : स्वप्नवत वाटणारा एव्हरग्रीन हिमाचल... स्वर्गाप्रमाणे भासणाऱ्या या सुंदर ठिकाणी जर तुम्हाला कमी बजेटमध्ये फिरण्याची संधी मिळत असेल तर तुम्ही याचा नक्की फायदा घेतला पाहिजे. जर तुमचं हिमाचलला जायचं स्वप्न अपूर्णच राहिलं असेल, आणि तुम्हाला या ठिकाणी जायची इच्छा असेल तर तुम्ही लवकरच जाऊ शकाल. कारण भारतीय रेल्वे हिमाचलला फिरण्याची संधी देत आहे. स्वर्गाप्रमाणे भासणारा 'हिमाचल'...जोडीदाराची साथ...सुख आणखी काय असतं! असं तुमच्या तोंडातून आपसूकच निघेल. जाणून घ्या या पॅकेजबद्दल..
कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करत असाल, तर हे टूर पॅकेज सर्वोत्तम
भारतीय रेल्वेच्या IRCTC ने प्रवास प्रेमींसाठी एक उत्तम संधी आणली आहे. ज्यामध्ये तुम्ही हिमाचलच्या दोन सुंदर ठिकाणांना भेट देऊ शकता, डलहौसी आणि मॅक्लॉडगंज, तेही अगदी कमी बजेटमध्ये... 8 दिवसांच्या या सहलीत तुम्हाला राहण्यापासून ते जेवणापर्यंत अनेक प्रकारच्या सुविधा मिळतील. IRCTC ने नुकतीच आपल्या सोशल मीडियावर टूर पॅकेजची माहिती शेअर केली आहे. 8 दिवसांच्या या सहलीत तुम्हाला हिमाचलची सुंदर ठिकाणे पाहता येतील. ज्यामध्ये जेवणापासून ते निवासापर्यंतच्या सुविधा उपलब्ध असतील. जर तुम्ही कुटुंबासोबत सहलीचे नियोजन करत असाल तर हे टूर पॅकेज सर्वोत्तम आहे. या पॅकेजशी संबंधित महत्त्वाचे तपशील जाणून घ्या.
पॅकेजचे नाव- एव्हरग्रीन हिमाचल-कन्फर्म तिकीट
पॅकेज कालावधी- 7 रात्री आणि 8 दिवस
प्रवास - ट्रेन
कव्हर केलेली ठिकाणं- डलहौसी, मॅक्लॉडगंज, अंबाला
'या' सुविधा उपलब्ध असतील
ट्रेनमध्ये 3AC वर्गाची तिकिटे उपलब्ध असतील.
राहण्यासाठी डिलक्स हॉटेलची सुविधा उपलब्ध असेल.
या टूर पॅकेजमध्ये नाश्ता आणि रात्रीचे जेवण उपलब्ध असेल.
IRCTC ने ट्विट करून माहिती दिली
IRCTC ने या टूर पॅकेजची माहिती देणारे ट्विट शेअर केले आहे. ज्यामध्ये तुम्हाला हिमाचलचे सुंदर नजारे पहायचे असतील तर तुम्ही IRCTC च्या या अप्रतिम टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता, असं म्हटलंय.
प्रवासासाठी एवढी रक्कम आकारली जाईल
या ट्रिपमध्ये तुम्ही एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला 56,850 रुपये मोजावे लागतील.
दोन लोकांना प्रति व्यक्ती 33,150 रुपये द्यावे लागतील.
तीन लोकांना प्रति व्यक्ती 26,350 रुपये शुल्क भरावे लागेल.
तुम्हाला मुलांसाठी वेगळी फी भरावी लागेल. बेडसाठी (5-11 वर्षे) तुम्हाला 12,850 रुपये द्यावे लागतील
बेडशिवाय तुम्हाला 5,600 रुपये द्यावे लागतील.
अशी बुकींग करू शकता
तुम्ही या टूर पॅकेजसाठी IRCTC च्या अधिकृत वेबसाइटवरून बुक करू शकता. याशिवाय, IRCTC पर्यटक सुविधा केंद्र, क्षेत्रीय कार्यालये आणि प्रादेशिक कार्यालयांमधूनही बुकिंग करता येते. पॅकेजशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकता.
हेही वाचा>>>
Travel : पांढरा शुभ्र..स्वर्गाप्रमाणे भासणारा 'चेन्नई एक्सप्रेस' मधील 'हा' तोच लोकप्रिय धबधबा! आश्चर्यकारक तथ्यं जाणून वाटेल नवल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )