Mumbai Rain News : मुंबईत पावसाचा (Mumbai Rain) जोर वाढला आहे. वाढत्या पावसामुळ सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. मुंबईत शहर आणि उपनगरात रात्रीपासून कोसळणाऱ्या पावसामुळं रेल्वे वाहतुकीवर (railway traffic) परिणाम झाला आहे. पावसामुळं मध्य रेल्वे 10 ते 15 मिनिट उशिराने धावत आहे. तर पश्चिम रेल्वे 5 ते 6 मिनिट विलंबाने धावत आहे तर हार्बर रेल्वे सुद्धा 5 ते 6 मिनिट उशिराने धावत आहे.


स्थानकात चाकरमनी आणि प्रवशांची गर्दी


दरम्यान, सध्या मुंबईत जरी पावसाचा जोर वाढला असला तरी देखील कोणत्याही रेल्वे स्थानकात रुळावर पाणी साचलेलं नाही. त्यामुळं रेल्वे वाहतूक सुरु आहे. फक्त काही मिनिटे उशिराने लोकल रेल्वे सुरु आहेत. कल्याण वरुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत असल्याने कल्याण स्थानकात चाकरमनी आणि प्रवशांची गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला येणाऱ्या लांब पल्याच्या गाड्यांमुळं सिग्नल मिळत नसल्यानं लोकल ट्रेनला उशीरानं धावत आहेत.


रस्त्यांवर पाणी, वाहतूक संथ गतीनं सुरु


दरम्यान, जोरदार पावसामुळं रस्त्यांवर काही ठिकाणी पाणी साचलं आहे. दादर पूर्वे रेल्वे स्थानक परिसरात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे. तर माटुंगा-सायन किंग्ज सर्कल गांधी मार्केट परिसरात पाणी साचायला सुरुवात झालीय. दरम्यान, रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात केल्यानं वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे, वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. त्यामुळं ठिकठिकाणी ट्रॅफिक जाम होत असल्याचंही पाहायला मिळत आहे. दरम्यान, हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस सुरु आहे. रस्त्यावर पाणी साचालया सुरुवात देखील झाली आहे. तसेच ठाण्यात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलं आहे.


आज मुंबईत पावसाचा यलो अलर्ट जारी


हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार  मुंबईत काल सायंकाळपासून पाऊस सुरु आहे. काल हवामान विभागानं मसुळधार ते अति मसुळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार मध्य रात्रीपासून मुंबईत पाऊस सुरु आहे. दरम्यान, आजही मुंबईत मुसळधार पावसाचा यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला आहे. दरम्यान, पुढील 3 ते 4 तास पावसाची संततधार कायम राहणार असल्याची माहिती देखील हवामान विभागानं दिली आहे. 


महत्वाच्या बातम्या:


मुंबईकरांसाठी पुढचे 3 ते 4 तास महत्वाचे, पावसाचा जोर कायम राहणार, मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरु