मुंबई : एचडीएफसी (HDFC) ही खासगी क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. या बँकेने नुकतेच आपल्या एसएमएसच्या सुविधेबाबत मोठा निर्णय घेतला आहे. आता यूपीआयच्या माध्यमातून 100 रुपयांपेक्षा कमी ट्रान्झिशन्स केल्यास त्याचा कोणताही एसएमएस अर्लट (HDFC Bank SMS Alert) ग्राहकांना मिळणार नाही. त्यामुळे आता 100 रुपयांपेक्षा कमी ट्रान्झिशन्स केल्यास बँकेच्या खातेदरांना स्वत:हून खात्यात किती पैसे शिल्लक आहेत, ते तपासावे लागणार आहे.
एचडीएफसी बँकेने नेमका काय निर्णय घेतला आहे?
एचडीएफसी बँकेने घेतलेल्या या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 25 जूनपासून केली जाणार आहे. यूपीआयच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यवहारांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. अगदी 10 रुपयांचे ट्रान्झिशनदेखील अनेकजण यूपीएयच्या मदतीनेच करत आहेत. मात्र आता एचडीएफसी बँकेने याच यूपीआयबाबत एक निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांनी यूपीआयच्या मदतीने 100 रुपयांपेक्षा कमी ट्रान्झिशन्स केल्यास त्यांचा कोणातही मेसेज अलर्ट जाणार नाही. अगोदर अगदी 10 रुपयांचे ट्रान्झिशन केले तरीदेखील तुम्हाला मेसेज यायचा. आता मात्र तसा कोणताही मेसेज येणार नाही. तसेच 500 रुपयांपेक्षा कमी रुपये तुमच्या खात्यात क्रेडिट झाल्यास, त्याचाही मेसेज तुम्हाला येणार नाही. एकंदरीत 100 रुपयांपेक्षा कमीचे डेबिट आणि 500 रुपयांपेक्षा कमी रकमेच्या क्रेडिट व्यवहाराचा कोणताही मेसेज एचडीएफसीतर्फे पाठवला जाणार नाही.
पुन्हा पुन्हा नोटिफिकेशनची गरज नाही, ग्राहकांची भावना
एचडीएफसीकडून मेसेजसंदर्भात हा निर्णय घेतला असला तरी ईमेलची सुविधा मात्र कायम राहणार आहे. तुम्ही कोणतेही ट्रान्झिशन केल्यास त्याची माहिती तुम्हाला मेलच्या माध्यमातून दिली जाईल. कमी किमतीच्या ट्रान्झिशनचे बँकेने नोटीफिकेश देऊ नये, कारण तसे नोटिफिकेशन यूपीआय अॅपच्या माध्यमातून दिले जाते. त्यामुळे पुन्हा पुन्हा नोटिफिकेशनची गरज नाही, अशा भावना ग्राहकांकडून व्यक्त केल्या जात होत्या. त्यामुळे एचडीएफसीने हा निर्णय घेतला आहे.
मेसेजची संख्या 40 कोटींच्या घरात
सध्या यूपीआयचा वापर वाढलेला आहे. त्यामुळे ट्रान्झिशन्स वाढल्यामुळे बँकांकडून येणाऱ्या मेसेजचे प्रमाणही चांगलेच वाढलेले आहे. बँका रोज कोट्यवधी मेसेज ग्राहकांना पाठवतात. मिळालेल्या माहितीनुसार रोज पाठवल्या जाणाऱ्या मेसेजची ही संख्या 40 कोटींच्या घरात आहे. त्यामुळे एसएमएसच्या सुविधेसाठी बँकांना कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात.
एचडीएफसी बँकेची शेअर बाजारातील स्थिती काय?
दरम्यान, एचडीएफसी ही खासगी बँकिंग क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक आहे. सध्या या बँकेच्या एका शेअरचे मूल्य 1510 रुपये आहे. मंगळवारी या बँकेच्या शेअरची किंमत 1530.50 रुपये होती. 76 टक्के अॅनालिस्ट्सनी या बँकेचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. 10 टक्के तज्ज्ञांनी या बँकेचे शेअर्स होल्ड करावेत, असे सांगितले आहे.
हेही वाचा :
मंगळवारी सुस्साट, बुधवारीही मुसंडी मारणार? हे 'पाच' पेनी स्टॉक्स पाडणार पैशांचा पाऊस
सरकारच्या तिजोरीत पैसेच पैसे! आरबीआयनंतर आता एलआयसी देणार 3662 कोटींचा लाभांश!
निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजारात नेमकं काय घडणार? जाणून घ्या मार्केटचा 20 वर्षांचा इतिहास!