Shani Dev : न्यायदेवता शनी (Shani Dev) सध्या कुंभ राशीत स्थित आहे. गेल्या वर्षी शनीने कुंभ राशीत (Aquarius Horoscope) संक्रमण केलं होतं. तर, पुढच्या वर्षी म्हणजेच 2025 मध्ये शनी (Lord Shani) मीन राशीत संक्रमण करणार आहे. सध्या शनी पूर्वा भाद्रपदाच्या द्वितीय चरणात आहे. तर, 18 ऑगस्टला शनीची वक्री चाल असणार आहे. अशा परिस्थितीत शनीची 97 दिवस चाल कोणत्या राशींसाठी भाग्यवान ठरणार आहे ते जाणून घेऊयात. 


वृश्चिक रास (Scorpio Horoscope)


शनीचं हे संक्रमण वृश्चिक राशीसाठी फायदेशीर ठरणार आहे. या काळात तुमची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या कामाला गती मिळेल. तसेच, तुमच्या संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या कुटुंबियांच्या आरोग्याची विशेष काळजी घ्या. व्यावसायिकांच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमच्यासाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. 


कन्या रास (Virgo Horoscope)


कन्या राशीच्या लोकांसाठी शनीच्या संक्रमणाचा चांगला फायदा होणार आहे. या काळात कायदेशीर बाबींमध्ये तुमचा विजय होऊ शकतो. व्यवसाय करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळू शकते. तसेच, तुमची आर्थिक स्थिती मजबूत होईल. कामानिमित्त तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. तसेच, या दरम्यान तुमच्या आरोग्याची काळजी घ्या. 


कुंभ रास (Aquarius Horoscope)


कुंभ राशीच्या लोकांसाठी शनीचं हे संक्रमण शुभ मानलं जाणार आहे. या काळात तुम्हाला कुटुंबियांकडून तसेच, नातेवाईकांकडून भरपूर आशीर्वाद मिळतील. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल. शनीच्या कृपेने समाजात तुमचं स्थान वाढेल. व्यावसायिक समस्यांमध्ये तुम्हाला फायदा होईल. तुमच्या आर्थिक समस्याही दूर होतील.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : अवघ्या काही तासांतच सुरु होतोय 'पंचक काळ', सर्व 12 राशींना सावधानतेचा इशारा; चुकूनही 'या' गोष्टी करू नका, आयुष्यभर होईल पश्चाताप