Horoscope Today 29 May 2024 : आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले, तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? मकर, कुंभ, मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या...


मकर रास (Capricorn Horoscope Today)


नोकरी (Job) - आज कामाच्या ठिकाणी तुमचा इतरांशी व्यवहार चांगला असणार आहे. तुमचा बॉस तुमच्या कामगिरीवर प्रसन्न असेल. 


व्यापार (Business) - आज तुम्ही व्यवसायात ज्या नवीन वस्तूंचा समावेश कराल त्याची चांगली विक्री होईल. तुम्हाला चांगला नफा मिळेल. 


तरूण (Youth) - आज तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर फिरायला जाऊ शकता. तसेच, त्या ठिकाणी महत्त्त्वपूर्ण माहिती गोळा करू शकता. 


आरोग्य (Health) - डोळ्यांसी दृष्टी अंधुक असल्या कारणाने तुम्हाला आज थोडा त्रास होऊ शकतो. त्यासाठी वेळीच चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. 


कुंभ रास (Aquarius Horoscope Today)


नोकरी (Job) - आजचा दिवस तुमच्यासाठी फार सामान्य असणार आहे. एखादे काम पूर्ण न झाल्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. 


व्यापार (Business) - तुमचा व्यवसाय चांगला चालेल. फक्त कोणाला पैसे देताना सावधानता बाळगावी. 


तरूण (Youth) - तरूणांनी नोकरीच्या शोधात असताना बरोबर स्पर्धा परीक्षांचा देखील अभ्यास करावा. यातून नक्कीच सकारात्मक परिणाम मिळतील. 


आरोग्य (Health) - आज तुमचं आरोग्य चांगलं असेल. पण, जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.


मीन रास  (Pisces Horoscope Today)


नोकरी (Job) - कामाच्या ठिकाणी तुमची चांगली प्रगती होईल. अनेकजण तुमच्या कामाचं कौतुक करतील. 


व्यापार (Business) - आज व्यावसायिक कामासाठी तुम्हाला जर कोणाची मदत हवी असेल तर ती तुम्हाला आज अगदी सहज मिळेल. 


तरूण (Youth) - घरातील सर्व ज्येष्ठ व्यक्तींचा आदर करायला शिका. अन्यथा यावरून तुम्हाला बोलणी खावी लागू शकतात. 


आरोग्य (Health) - वाढत्या उन्हाळ्यापासून तुम्ही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा: 


Astrology : अवघ्या काही तासांतच सुरु होतोय 'पंचक काळ', सर्व 12 राशींना सावधानतेचा इशारा; चुकूनही 'या' गोष्टी करू नका, आयुष्यभर होईल पश्चाताप