एक्स्प्लोर

RBI on Rs 2000 notes: 16 दिवसात 2000 रुपयांच्या किती नोटा बँकामध्ये झालेत जमा? RBI ने दिली महत्त्वाची माहिती

RBI on Rs 2000 notes: बाजारात चलनात असलेल्या 2000 रुपयांच्या नोटा पुन्हा बँकेकडे जमा होत असून आरबीआयने त्याबाबत महत्त्वाची माहिती दिली.

RBI on Rs 2000 notes:  भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) 19 मे रोजी दोन हजार रुपयांच्या नोटा मागे घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर बँकांमध्ये दोन हजार नोटा जमा करण्यात येत आहे. बँकांमध्ये 23 मे पासून दोन हजार रुपयांच्या नोटा जमा करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत, मागील 16 दिवसात 2000 रुपयांच्या (Rs 2000 notes) किती नोटा जमा झाल्यात, याची माहिती आरबीआयने दिली आहे. आतापर्यंत 1.80 लाख कोटी मूल्याच्या 2000 रुपयांच्या नोटा बँकांमध्ये जमा झाल्या असल्याची माहिती आरबीआयने गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दिली. 

आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी माहिती दिली की, 2000 रुपयांच्या जेवढ्या नोटा चलनात होत्या, त्यापैकी आता 50 टक्के नोटा बँकांकडे आल्या आहेत. नोटा चलनातून मागे घेण्याचा निर्णय जाहीर करण्याच्या दिवसापर्यंत 3.62 लाख कोटी रुपयांच्या नोटा चलनात होत्या. 

2000 रुपयांच्या 85 टक्के नोटा बँकेत जमा?

RBI गव्हर्नर शक्तिकांत दास  म्हणाले की, 2000 रुपयांच्या 85 टक्के नोटा थेट बँक खात्यात जमा केल्या जात आहेत. हे आमच्या अपेक्षेनुसार आहे. बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी कोणतीही घाई, गोंधळ सुरू नसल्याची माहिती त्यांनी दिली. 2000 रुपयांच्या नोटा जमा करण्यासाठी किंवा बदलण्यासाठी 4 महिन्यांचा कालावधी आहे. या नोटा जमा करण्यासाठी घाई करण्याची गरज नाही. आरबीआयकडे चलनाचा पुरेसा साठा आहे. त्यांनी लोकांना वेळ काढून 2000 रुपयांच्या नोटा आरामात जमा करा किंवा बदलून घ्या असेही त्यांनी म्हटले. आपल्यापैकी अनेकांना अखेरच्या क्षणी काम करण्याची सवय असते. मात्र, या 2000 रुपयाच्या नोटा जमा करण्यासाठी कोणीही शेवटच्या दिवसाची प्रतिक्षा करू नये, असे आवाहन त्यांनी केले. सप्टेंबर महिन्यातील शेवटच्या 10 ते 15 दिवसांत बँकांमध्ये नोटा जमा करण्यासाठी गर्दी होईल, असा अंदाजही त्यांनी वर्तवला.

2016 च्या नोट बंदीनंतर 2000 ची नोट चलनात आली

8 नोव्हेंबर 2016 रोजी रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीची घोषणा केली. त्यावेळी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. खरंतर, त्याच वर्षी RBI कायदा, 1934 च्या कलम 24(1) अंतर्गत 2000 रुपयांच्या नवीन नोटा जारी करण्यात आल्या.

मागील तीन वर्षात 2000 रुपयांची एकही नोट छापली नाही 

2016-17 या आर्थिक वर्षात 2000 रुपयांच्या 35429.91 कोटी नोटा छापल्या होत्या. यानंतर 2017-18 मध्ये अत्यंत कमी 1115.07 कोटी नोटा छापण्यात आल्या आणि त्यात आणखी कपात करुन 2018-19 मध्ये केवळ 466.90 कोटी नोटा छापण्यात आल्या. 2019-20, 2020-21 आणि 2021-22 या तीन आर्थिक वर्षांमध्ये 2000 रुपयांची एकही नोट छापलेली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या

RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
Donald Trump : रशियासोबत डिझेल खरेदीची डील करताच ट्रम्प यांचा यूटर्न, भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, अमेरिकेचा मोठा निर्णय
भारत आणि चीनवरील 100 टक्के टॅरिफचं संकट टळलं, डोनाल्ड ट्रम्प यांचा यूटर्न, अमेरिकेचा मोठा निर्णय 
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
साखरेच्या वाढत्या किंमतीमुळं सरकारनं घेतला मोठा निर्णय, इथेनॉलमध्ये साखरेच्या वापरावर बंदी, आता इथेनॉलचे उत्पादन कसे होणार?
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
RBI चा मोठा निर्णय! बँकांसाठी नवीन नियम लागू, तुमच्या खात्यावर परिणाम होणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 

व्हिडीओ

SIR Election Commision And BJP : मुद्दा एसआयआरच्या घोळाचा, आरोप सत्तेच्या खेळाचा | Special Report ABP Majha
Shetitil Navdurga | Sarika Gaikwad | दुःखातून उभी राहिली, मातीतून यश घडवलं!
Sanjay Raut News : मी सर्वोच्च न्यायालयाची माफी मागतो… संजय राऊत यांची दिलगिरी; नेमकं काय म्हणाले?
Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena Eknath Shinde: एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
एकनाथ शिंदे अकार्यक्षम मंत्र्यांवर नाराज, शिवसेनेत लवकरच मोठे फेरबदलाची शक्यता; तरुण आमदारांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडणार
Chhatrapati Sambhajinagar : दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
दुष्काळाची दाहकता! जनावरांचा चारा चोरीला जाऊ नये म्हणून वैरणीला कुलूप, भीषण वास्तव समोर
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
पदवीधर निवडणुकीवरून मोठा ट्विस्ट!आदल्या दिवशी सतीश चव्हाणांचा पाठिंबा काढला, आज शिंदेसेनेनं पुन्हा महायुतीला जवळ केलं; एका रात्रीत काय घडलं?
Pune Teacher Election : पुणे शिक्षकमध्ये पहिल्या फेरीत 25 हजारापेक्षा जास्त मतं घेऊन विजयी होणार, माजी आमदार दत्तात्रय सावंत यांनी थेट आकडेवारी मांडत विजयाचं गणित सांगितलं
पुणे शिक्षकमध्ये भाजप-सेनेचे स्वतंत्र उमदेवार रिंगणात,  माजी आमदार दत्तात्रय सावंत प्रचंड आशावादी, पहिल्या फेरीत विजयाचा दावा 
RBI : बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी सुरु,दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
दुबईच्या बँकेच्या भारतातील शाखा RBL बँकेत विलीन होणार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मंजुरी
FDA Action : कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
कार्यक्षेत्राच्या बाहेर टाकली रेड; पर्सनल इंटरेस्ट असल्याचा ठपका, एफडीएच्या 20 हून अधिक अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार
Gokul Milk Union Election : आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
आधी सहलीवर पाठवलं; आता सौंदत्तीच्या देवीची घ्यायला लावली शपथ, गोकुळच्या निवडणुकीत ठराव धारकांना देवीच्या प्रकोपाची भीती, व्हिडीओ समोर
Maharashtra Weather Updates Rain Marathi News: मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
मान्सूनचं कमबॅक होणार, राज्यात 5 दिवस परतीचा पाऊस कोसळणार; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज
Embed widget