GST Collection : अर्थसंकल्प सादर होण्याच्या एक दिवस आधीच केंद्र सरकारला चांगली बातमी मिळाली आहे. जीएसटी कर संकलनात जानेवारी महिन्यात वाढ झाली आहे. जीएसटी कर संकलनात 10 टक्क्यांची वाढ झाली आहे. जानेवारी महिन्यातील कर संकलन 1.72 लाख कोटी रुपये इतके झाले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जीएसटी संकलन 10.4 टक्क्यांनी वाढले आहे. अर्थ मंत्रालयाने जीएसटीचे आकडे जारी केले आहेत.
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी जीएसटी कर संकलनावर आनंद व्यक्त केला आहे. जीएसटी कर संकलनातील वाढ ही भारतीय अर्थव्यवस्था मजबूत होत असल्याचे संकेत असल्याचे सीतारमन यांनी म्हटले. सरकारकडून जीएसटी कर प्रणाली आणखी सुलभ करण्यासाठी प्रतिबद्ध असल्याचे त्यांनी म्हटले.
जानेवारी 2024 मध्ये GST कर संकलनात कोणाचा किती वाटा?
सीजीएसटी | ₹31,844 कोटी |
एसजीएसटी | ₹39,476 कोटी |
आईजीएसटी | ₹89,989 कोटी |
सेस | ₹10,701 कोटी |
अंतरीम अर्थसंकल्पाच्या एक दिवस आधीच जीएसटीचे उत्साहवर्धक आकडे समोर आल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. अधिकच्या कर संकलनामुळे मोठ्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांवर खर्च करण्यास वाव मिळणार आहे.
> जीएसटी कर संकलन का वाढले?
- अर्थव्यवस्थेमध्ये बळकटी
- सण-उत्सवाच्या काळात खर्चात वाढ
- जीएसटी अनुपालनात सुधारणा
-सरकारकडून करण्यात आलेल्या विविध सुधारणा
> जीएसटी संकलन महत्त्वाचे का आहे?
जीएसटी संकलन अनेक गोष्टींमुळे महत्त्वाचे आहे. सरकारच्या महसुलाचा तो एक महत्त्वाचा स्रोत आहे. शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधा यासारख्या विविध सरकारी कार्यक्रम आणि योजनांना निधी देण्यासाठी GST संकलनातून सरकारच्या तिजोरीत वापरले जाते.
जीएसटी कर संकलनातील वाढ ही अर्थव्यवस्थेतील वाढ दर्शवते. जेव्हा GST संकलन वाढते तेव्हा लोक जास्त खर्च करत असल्याचे दिसून येते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळते.