GST collection : दिवसेंदिवस देशाच्या तिजोरीत मोठी भर पडताना दित आहे. गेल्या एप्रिल (April) महिन्यात GST संकलनाने आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडले आहेत.  GST संकलनात मोठी वाढ झालीय. एप्रिल महिन्यातील जीएसटी महसूल (GST collection) आत्तापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 2.10 लाख कोटी रुपये झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटी महसूल पहिल्यांदाच 2 लाख कोटींच्या पार केला आहे.  


महसुलाची वार्षिक वाढ 12.4 टक्क्यांवर 


मिळालेल्या माहितीनुसार, महसुलाची वार्षिक वाढ ही 12.4 टक्क्यांवर गेली आहे. जीएसटी महसूलात महाराष्ट्राचा वाटा सर्वाधिक आहे. राज्याच्या जीएसटी महसूलात 13 टक्क्यांची वाढ झालीय. तर मार्च महिन्यात 37 हजार 671 कोटी रुपयांचा जीएसटी महसूल जमा झाला आहे. 


कर संकलनात महाराष्ट्र आघाडीवर 


कर संकलनात महाराष्ट्रानं मोठी आघाडी घेतली आहे. सर्वाधिक कर संकलन महाराष्ट्रातून झालं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा देशाच्या तिजोरीला मोठा हातभार लावण्याचं काम महाराष्ट्रानं केलं आहे. जीएसटी संकलनात महाराष्ट्राचा13 टक्क्यांचा वाटा आहे. दरम्यान, महाराष्ट्र कर संकलनात सातत्यानेच आघाडीर राहीलेलं राज्य आहे. यावेळी तर पहिलाच क्रमांक आला आहे.


मार्च महिन्यात किती झालं होतं जीएसटी संकलन?


दरम्यान, मार्च महिन्यात देखील मोठ्या प्रमाणात कर संकलन झालं होतं. मार्च महिन्यात 1.78 लाख कोटी रुपये इतके मासिक सकल जीएसटी महसूल संकलन झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये 11.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. देशांतर्गत व्यवहारांमधून वस्तू आणि सेवा कर संकलनात 17.6 टक्के इतकी लक्षणीय वाढ झाल्यामुळं हे विक्रमी संकलन झाले आहे.


महत्वाच्या बातम्या:


राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्यांना आयकर विभागाचा झटका, कर चुकवणाऱ्यांची होणार अडचण