Government Schemes For Women : सध्या देशातील लोकसंख्या सुमारे 150 कोटी आहे. यामध्ये सुमारे 48 टक्के महिला आहेत. याचा अर्थ देशाच्या लोकसंख्येपैकी जवळपास निम्मी लोकसंख्या ही महिलांची आहे. मात्र आजही देशातील महिलांना पुरुषांच्या बरोबरीने संधी मिळत नाहीत. मात्र, गेल्या काही वर्षांचा आढावा घेतला तर देशाच्या विकासात महिलांचेही योगदान मोठं आहे.
केंद्र सरकार महिला सक्षमीकरणासाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. केंद्र सरकारशिवाय देशातील विविध राज्यांतील राज्य सरकारेही महिलांसाठी अनेक योजना राबवत आहेत. सरकारनं 2024 मध्ये महिलांसाठी कोणत्या योजना सुरु केल्या आहेत? कोणत्या राज्यातील महिलांना याचा लाभ मिळत आहे. याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
एलआयसीची विमा सखी योजना
2024 हे वर्ष संपत आले आहे. आता फक्त काही दिवस उरले आहेत. वर्षाच्या अखेरीस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना एक खास भेट दिली आहे. हरियाणातून पंतप्रधान मोदींनी महिलांसाठी आयुर्विमा महामंडळ म्हणजेच LIC ची विमा सखी योजना सुरू केली आहे. यामध्ये 18 ते 70 वयोगटातील महिला ज्यांनी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांना लाभ दिला जाईल. योजनेंतर्गत महिलांना विमा प्रतिनिधी बनवले जाणार आहे. यामध्ये पुढील तीन वर्षांसाठी प्रशिक्षण आणि स्टायपेंडही दिला जाणार आहे.
दिल्ली मुख्यमंत्री महिला सन्मान योजना
दिल्लीत राहणाऱ्या महिलांना काही दिवसांपूर्वीच एक मोठी खूशखबर मिळाली आहे. दिल्ली सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री महिला सन्मान योजना सुरू केली आहे. सध्या या योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जाणार आहेत. मात्र निवडणुकीनंतर या योजनेंतर्गत 2100 रुपये दिले जातील. योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी महिलांकडे दिल्ली मतदार कार्ड असणे आवश्यक आहे.
कर्नाटक सरकारची सुभद्रा योजना
कर्नाटक सरकारने राज्यातील महिलांसाठी सुभद्रा योजना सुरू केली. या योजनेंतर्गत, सरकार राज्यातील महिलांना दरवर्षी 10,000 रुपयांचा हप्ता पाठवते. सरकार महिलांच्या खात्यात प्रत्येकी पाच हजार रुपये वर्षातून दोनदा देते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील महिला ज्यांचे एकूण कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे त्या योजनेसाठी पात्र आहेत. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा (NFSA) किंवा राज्य अन्न सुरक्षा योजना (SFSS) अंतर्गत महिलांचे नाव शिधापत्रिकेवर नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. 21 ते 60 वयोगटातील महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
महाराष्ट्र सरकारची लाडकी बहिण योजना
महाराष्ट्रामध्ये देखील महायुतीच्या सरकारनं विधानसभा निवडणुकीच्या आधीच लाडकी बहिण योजना सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला महिन्याला 1500 रुपये दिले जात आहेत. मात्र, आता निवडणुकीनंतर पुन्हा राज्यात महायुतीचं सरकार आलं आहे. या सरकारनं महिलांमा 2100 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे.