Richest People Luxury House : देशात अब्जाधिशांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणात पैसा येत असल्यानं हे लोक वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक, संपत्ती खरेदी करताना दिसत आहेत. 2024 मध्ये, एकीकडे व्याजदर वाढत असताना सामान्य माणूस कर्ज घेणे आणि घर खरेदी करणे टाळत असताना, दुसरीकडे भारतात आलिशान घरांची मागणी झपाट्याने वाढली आहे. 100 कोटी किंवा त्याहून अधिक किमतीची घरे खरेदी केली जात आहेत. अब्जाधिस असलेले लोक कोट्यावधी रुपयांची घरं खऱेदी करत आहेत. 


श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात आलिशान घर खरेदी करत आहेत. डी-मार्टचे संस्थापक आणि अब्जाधीश गुंतवणूकदार राधाकिशन दमाणी यांनी 2021 मध्येच मुंबईच्या मलबार हिल भागात 1001 कोटी रुपयांना एक बंगला खरेदी केला होता. 2024 मध्ये हा ट्रेंड अधिक मजबूत झाला आहे. अब्जाधीश आणि लक्षाधीश अल्ट्रा-लक्झरी प्रॉपर्टीजमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत.


मुंबई ते दिल्ली मोठे सौदे


2023-2024 दरम्यान भारतात अनेक विक्रमी सौदे झाले. जेपी तापडिया कुटुंबाने मुंबईतील मलबार हिल भागातील लोढा मलबार प्रकल्पात 369 कोटी रुपयांचे घर खरेदी केले आहे. याच प्रकल्पात नीरज बजाज यांनी 252.5 कोटी रुपयांचे घर आणि बीके गोएंका यांनी ओबेरॉय थ्री सिक्स्टी वेस्ट, वरळी येथे 230.5 कोटी रुपयांचे घर विकत घेतले. मुंबईप्रमाणेच दिल्ली-एनसीआरमध्येही लक्झरी प्रॉपर्टीची मागणी वाढत आहे. ऋषी पार्थीने नुकतेच गुरुग्रामच्या 'कॅमेलियास प्रोजेक्ट'मध्ये 190 कोटी रुपयांचे घर आणि स्मृती अग्रवालने 95 कोटी रुपयांना घर खरेदी केले आहे. ऋषी पार्थी हे सॉफ्टवेअर तंत्रज्ञान कंपनीचे संस्थापक आहेत, तर स्मृती अग्रवाल एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातील आहेत.


याशिवाय बंगळुरुमध्येही विक्रमी सौदे पाहायला मिळाले. रुईया इंटरनॅशनल होल्डिंगने 64.6 कोटी रुपयांचे घर आणि इन्फोसिसचे संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी 50 कोटी रुपयांचे घर खरेदी केले.


भारतात आलिशान घरांची मागणी वाढण्याची कारणे


अहवालानुसार, भारतात अति-उच्च-नेट-वर्थ व्यक्तींची संख्या (अल्ट्रा-एचएनआय) वेगाने वाढत आहे. 2023 मध्ये भारतातील अल्ट्रा-एचएनआयची संख्या 13,263 होती, जी 2028 पर्यंत 19,908 पर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे. त्यांचे उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत म्हणजे स्टॉक, व्यवसाय आणि खाजगी इक्विटी.त्याच वेळी, नाइट फ्रँकच्या अहवालानुसार, 2021 पासून लक्झरी अपार्टमेंटच्या विक्रीत मोठी उडी आली आहे. सप्टेंबर 2023 पर्यंत भारतात 1.3 लाख कोटी रुपयांच्या लक्झरी अपार्टमेंट्सची विक्री झाली, जी 2021 च्या तुलनेत 648% जास्त आहे. गुरुग्राम हे दिल्ली-एनसीआरमधील आलिशान घरांचे केंद्र म्हणून उदयास आले आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत, गुरुग्राममधील 59 टक्के विक्री लक्झरी विभागातील होती. 2019 मध्ये हा आकडा केवळ 4% होता.


भारतातील सर्वात महागडी घरे


भारतातील सर्वात महागड्या घरांमध्ये पहिले नाव म्हणजे मुकेश अंबानींचे, त्यांचे गर हे 12,000 कोटी रुपयांचे आहे. अँटिलिया हे अंबानींचे घर मुंबईच्या अल्ट्रा प्राइम लोकेशनमध्ये आहे. यानंतर जेके हाऊस 6,000 कोटी रुपयांचे आहे, जे रेमंड ग्रुपचे गौतम सिंघानिया यांचे आहे. अनिल अंबानीचा 5,000 कोटींचा अड्डा, शाहरुख खानचा 200 कोटींचा मन्नत आणि अमिताभ बच्चनचा 120 कोटींचा जलसाही खूप लोकप्रिय आहेत. केएम बिर्ला यांच्या मलबार हिल येथील जातिया हाऊसची किंमत 3,000 कोटी रुपये आहे. ही घरे केवळ राहण्याची जागा नाहीत तर या सेलिब्रिटींची शान आणि ओळख आहेत.