एक्स्प्लोर

FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार

Pension FDI : केंद्र सरकार पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणुकीची मर्यादा 100 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील विधेयक पावसाळी अधिवेशनात आणलं जाऊ शकतं.

FDI in Pension Sector नवी दिल्ली : केंद्र सरकार पेन्शन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक मर्यादा 100 टक्के करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भातील विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आणलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे. यामुळं पेन्शन क्षेत्रात विदेशी गुंतवणूक वाढू शकते. केंद्र सरकारनं विमा क्षेत्र 100 टक्के विदेशी गुंतवणुकीसाठी खुलं केलं आहे. त्याचप्रमाणं पेन्शन क्षेत्र देखील विदेशी गुंतवणुकीसाठी खुलं केलं जाऊ शकतं. गेल्या वर्षी संसदेत विमा क्षेत्रातील गुंतवणुकीची मर्यादा 74 टक्क्यांवरुन 100 टक्के करण्यास मंजुरी मिळाली होती.  विमा कायदा 1938 मध्ये 2015 मध्ये विदेशी गुंतवणूक मर्यादा 49 टक्क्यांवरुन 74 टक्के करण्यात आली होती. 

पेन्शन क्षेत्रातील परकीय गुंतवणूक वाढणार

पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी कायदा 2013 मध्ये दुरुस्ती करुन पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली जाऊ शकते. यासंदर्भातील विधेयक संसदेच्या पावसाळी अधिवेशनात किंवा हिवाळी अधिवेशनात आणलं जाऊ शकतं, मात्र, त्यासाठी विविध परवानग्या घेतल्या जातील. पेन्शन फंडमध्ये सध्या विदेशी गुंतवणुकीवर 49 टक्क्यांची मर्यादा आहे. 

सूत्रांच्या माहितीनुसार दुरुस्ती विधेयकामध्ये PFRDA म्हणजेच पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीपासून एनपीएस ट्रस्ट वेगळा केला जाईल.  सध्या एनपीएस ट्रस्टची कर्तव्य आणि कार्य, अधिकार सध्या पीएफआरडीए सुधारणांतर्गत 2015 नुसार चॅरिटेबल ट्रस्ट आणि कंपनीज कायद्यात येतात. 

पेन्शन नियामक  आणि एनपीएस ट्रस्ट वेगवेगळे करण्याचा उद्देश यामागं आहे. यासाठी 15 सदस्यांचं सक्षम प्राधिकरण तयार केलं जाईळ. यातील बहुतांश सदस्य सरकारचे असतील, त्यात राज्यांचा समावेश असेल जे सर्वात मोठे योगदानकर्ते असतील.पेन्शन क्षेत्राच्या विकासासाठी, पेन्शन फंडावर पुरेसे अधिकार आणि केंद्रीय रेकॉर्ड ठेवणाऱ्या यंत्रणा आणि मध्यस्थ या सर्व गोष्टींसाठी पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटीची स्थापना करता आली होती. 
  
नॅशनल पेन्शन सिस्टीम भारत सरकारकडून निश्चित फायदा पेन्शन यंत्रणा बदलण्यासाठी आणली गेली होती. 1 जानेवारी 2004 पासून केंद्राच्या सेवेत रुजू होणाऱ्यांना (लष्करी दलं वगळून) एनपीएस लागू करण्यात आलं होतं. त्यानंतर 1 मे 2009 पासून सर्वांसाठी एनपीएसची अंमलबजावणी करण्यात आहे. जे वैकल्पिक आहे. 

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate : सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
सोनं 3 लाख, तर चांदी 6 लाखांपर्यंतचा दर गाठणार! अमेरिकेच्या कर्जाशी थेट संबंध, रॉबर्ट कियोसाकींचा मोठा दावा
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
धक्कादायक! सोन्याच्या खाणीत मोठी दुर्घटना, तब्बल 100 हून अधिक जणांचा मृत्यू, अनेकजण अडकल्याची भीती, बचावकार्य सुरु
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर
वारसा हक्क ते गुंतवणूक! भारतीय महिला बनणार 73 लाख कोटी रुपयांच्या मालक, अहवालातून महत्वाची माहिती समोर

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Social Media Influencers Schemes : सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
सरकारी योजनांवर व्हिडिओ बनवा अन् 1 लाख रुपयांपर्यंत कमवा; इन्फ्लुएन्सर्ससाठी सरकारची मोठी घोषणा
Mumbai Accident JCB fall down: क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
क्रेनने जेसीबी उचलला, हवेत उंचावर जाताच एका बाजूला कलला अन् धडामSSs... कुर्ल्यात भीषण दुर्घटना
Sugar Price Hike Marathi News: साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
साखरेच्या दरात पुन्हा ऐतिहासिक वाढ, ऐन सणासुदीच्या काळात महागाईची झळ, कोणत्या जिल्ह्यात किती दर?
Nagpur Crime love Triangle: एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
एकाच मुलीवर दोन कुख्यात गुंडांचा जीव जडला, रस्त्यावर जीवघेणी झुंज, बेल्टला लावलेला चाकू हाताला लागला अन् सगळंच संपलं
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
Embed widget