एक्स्प्लोर

Silver jewellery : केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर घातली बंदी, काय आहे कारण?

Silver jewellery : केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.

Plain Silver jewellery Import Ban: गेल्या काही महिन्यांपासून सोन्याच्या आणि चांदीच्या (Silver jewellery) किमतीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचं चित्र आहे.  एकीकडे सोन्याचा भाव लाखांच्या पार उसळला आहे तर दुसरीकडे, चांदीची किंमत दीड लाखांच्या जवळपास पोहोचल्या आहेत. अशातच, सणासुदीमध्ये सर्वसामान्यांसाठी सोनं-चांदी खरेदी खिश्याच्या परवडण्याच्या पार गेली आहे. या दरम्यान, केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांबाबत (Silver jewellery) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.या वर्षाच्या सुरुवातीला लखपती बनलेल्या चांदीची किंमत देशांतर्गत बाजारात आता दीड लाखाच्या दिशेने वेगाने अग्रेसर आहे. सोन्याच्या पाठोपाठ लोकांची चांदीमध्येही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढत असून आता केंद्र सरकारने चांदीच्या दागिन्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. बुधवारी एक मोठे पाऊल उचलत केंद्र सरकारने 31 मार्च 2026 पर्यंत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीवर बंदी घातली आहे.(Plain Silver jewellery Import Ban)

Plain Silver jewellery Import Ban: लघु आणि मध्यम व्यवसायांचे हितासाठी

सरकारने एका काल (बुधवारी) अधिसूचनेनुसार, साध्या चांदीच्या दागिन्यांवर पुढील वर्षी 31 मार्चपर्यंत आयात निर्बंध लादले आहेत. मुक्त व्यापार करारांचा (FTA) गैरवापर रोखण्यासाठी आणि तयार दागिन्यांच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात चांदीच्या आयातीला आळा घालण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. "आयात धोरणात 31 मार्च 2026 पर्यंत तात्काळ प्रभावाने मुक्त ते प्रतिबंधित असे सुधारणा करण्यात आली आहे," असे परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (DGFT) एका अधिसूचनेत म्हटले आहे. निर्बंध श्रेणीतील वस्तूंना सरकारकडून परवाना आवश्यक आहे. एप्रिल-जून 2024-25 ते एप्रिल-जून 2025-26 या कालावधीत प्राधान्य शुल्क सवलतींमधून साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीत झपाट्याने वाढ झाल्यामुळे हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. FTA च्या तरतुदींना डावलून होणाऱ्या आयातीमुळे देशांतर्गत उत्पादकांवर प्रतिकूल परिणाम होत होता आणि दागिने क्षेत्रात रोजगाराला आव्हान निर्माण होत होते, अशी माहिती आहे. सरकारचा असा विश्वास आहे की या निर्णयामुळे भारतातील दागिने उत्पादकांना समान संधी मिळेल, लघु आणि मध्यम व्यवसायांचे हित जपले जाईल आणि या क्षेत्रातील कामगारांसाठी उपजीविकेच्या संधी सुरक्षित होतील. DGFT किंवा परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने एक अधिसूचना जारी केली यामध्ये म्हटले आहे की, या श्रेणीतील आयात आतापर्यंत ‘मुक्त’ होती, पण आता ‘प्रतिबंधित’ करण्यात आली आहे. म्हणजे अशा वस्तू भारतात आणण्यासाठी आता सरकारी परवाना अनिवार्य असणार आहे.

Plain Silver jewellery Import Ban: चांदीच्या आयातीवर सरकारचा मोठा निर्णय

गेल्या काही महिन्यांत साध्या चांदीच्या दागिन्यांच्या आयातीत मोठी वाढ झाल्याचे लक्षात घेऊन सरकारने हा निर्णय घेतला आहे. तपासात असे स्पष्ट झाले की, अनेक देश मुक्त व्यापार करारांचा (FTA) फायदा घेत, ‘साध्या’ या श्रेणीखाली भारतात तयार किंवा डिझाइन केलेले दागिने आयात करत होते. या पद्धतीमुळे करचुकवेगिरी होत असून देशातील स्थानिक उद्योगांना तोटा सहन करावा लागत होता. भारतातील लाखो छोटे कारागीर आणि छोटे व्यवसाय चांदीच्या दागिन्यांवर अवलंबून आहेत. परदेशी दागिने करमुक्त येऊ लागले तेव्हा त्याचा थेट परिणाम स्थानिक उत्पादकांच्या विक्रीवर होऊ लागला, यामुळे छोट्या- छोट्या रोजगाराला धोका निर्माण झाला. अशा परिस्थितीत, या बंदीमुळे समानतेचे क्षेत्र निर्माण होईल आणि लहान कारागिरांच्या व्यवसायांचे संरक्षण होईल, असा सरकारचा विश्वास आहे. ही बंदी केवळ साध्या चांदीच्या दागिन्यांना लागू आहे. इतर चांदीच्या वस्तू जसे की भांडी, नाणी किंवा औद्योगिक वापरासाठी चांदी यांच्यावर नाही. त्या श्रेणींमध्ये FTA चा गैरवापर होत नव्हता.

 

महत्त्वाच्या बातम्या

Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
सोन्या चांदीची खरेदी करण्याची मोठी संधी! गेल्या 10 दिवसात दरात मोठी घसरण, सध्याचे दर काय?  
Mumbai CNG Price Hike : मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुंबईकरांना महागाईचा आणखी एक झटका! CNG च्या दरात पुन्हा दीड रुपयांची वाढ; आता किलोमागे किती रुपये मोजावे लागणार?
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 
मुलांच्या भविष्यासाठी सुरक्षित पर्याय, दरमहा फक्त 5000 रुपये जमा करा, 16 लाख रुपये मिळवा, नेमकी काय आहे योजना? 

व्हिडीओ

Sanjay Raut PC : 40 हजार कोटी कुणी खाल्ले, वर्षावर बंगल्यावर बुलडोजर फिरवा, राऊतांची आक्रमक प्रेस
Mahendra Dalvi On Sunil Tatkare : सुनील तटकरेंवर टीका करताना आमदार महेंद्र दळवींची जीभ घसरली
Nashik Bird Election : गिधाड विरूद्ध कावळा... पक्ष्यांच्या निवडणुकीत वातावरण का तापलं? Special Report
Hotel Vaishali and Rupali Pune : हॉटेल वैशाली-रुपाली बंद,हळवे पुणेकर भरभरून बोलले
Rahul Gandhi Phone Tapping Case : वादविवादाचं आवतण 'फोन टॅपिंग'चा बाण | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amit Shah : अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये पुण्यात महत्त्वाची बैठक, राष्ट्रवादीचे विलीनीकरण ते शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा,बैठकीत कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंमध्ये महत्त्वाची बैठक, कोणत्या मुद्यांवर चर्चा?  
Jitendra Awhad : डिलिमिटेशन बिलाला देशाच्या संविधानाशी प्रतारणा करण्यासारखंच, नताशा आव्हाड यांची पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
नताशा आव्हाड यांची डिलिमिटेशन विरोधात पोस्ट, जितेंद्र आव्हाड भूमिका स्पष्ट करत म्हणाले...
Gondia Crime News: दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
दिवाळीच्या सुट्टीत माहेरी पोहोचली; वैनगंगा नदीशेजारील जंगलात मृतावस्थेत आढळली; एअर हॉस्टेसच्या मृत्यूने गोंदियात खळबळ
Maharashtra Weather Update: राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
राज्यभरात 'गुलाबी थंडी'ची सुखद चाहूल; पुण्यात राज्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद, तर विदर्भात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज काय?
Eknath Shinde : अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा; राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न?
अमित शाह यांच्या स्वागतासाठी पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेची बॅनरबाजी! भाजप नेत्यांपेक्षा एकनाथ शिंदेंच्या बॅनर्सचीच चर्चा
Nvidia : प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री? एलन मस्कसह दीड लाख जणांचं लॉबिंग
प्रेमप्रकरणामुळं घात, CEO पदावरुन पायउतार, आता जेनसेन हुआंगची एनवीडियात पुन्हा एंट्री?
UAE Accident: 1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
1..2..3..4..5...नव्हे 23 गाड्या एकमेकांना धडकल्या; 14 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी, यूएईमध्ये भीषण अपघात!
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, RNC अध्यक्षांच्या हकालपट्टीची मागणी...
ट्रम्प यांना मोठा धक्का, मध्यावधी निवडणुकीतील पराभवानंतर पक्षात बंड, ट्रम्प यांच्या विश्वासू नेत्याच्या हकालपट्टीची मागणी
Embed widget