एक्स्प्लोर

Fuel Price Hike : सरकारी बँका, कंपन्यांनी खर्चाला लगाम घाला, अन्यथा...; केंद्र सरकारचा आदेश जारी

Government Expense Cut : देशांतर्गत आणि परदेश दौरे अत्यावश्यक असल्यासच मंजूर केले जातील आणि शक्य तितक्या कमी खर्चात ते पूर्ण करण्याचे निर्देश केंद्र सरकारने सार्वजनिक बँका आणि कंपन्यांना दिले आहेत. 

नवी दिल्ली : पश्चिम आशियातील तणाव आणि वाढत्या ऊर्जा संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सरकारी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, सरकारी विमा कंपन्या आणि सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्थांसाठी काटकसरीचे कठोर निर्देश जारी केले आहेत. अनावश्यक खर्च टाळणे, प्रवासावर नियंत्रण ठेवणे आणि शक्य तितक्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेणे बंधनकारक करण्यात आलं आहे.

अर्थ विभागाने जारी केलेल्या निर्देशांनुसार, सरकारी बँका (PSBs), प्रादेशिक ग्रामीण बँका (Regional Rural Banks RRBs), सरकारी विमा कंपन्या (Public Sector Insurance Companies PSICs) आणि  सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था (Public Sector Financial Institutions PSFIs) यांनी तातडीने खर्च नियंत्रणाचे उपाय अमलात आणावेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवणे आणि कार्यालयीन कामकाजात ऊर्जा बचतीला प्राधान्य देण्यासही सांगण्यात आलं आहे.

Video Conferencing Meetings : सर्व बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे

सरकारनं स्पष्ट केलं आहे की समीक्षा बैठका, सादरीकरणे, सल्लामसलत आणि प्रशासकीय बैठकांचा जास्तीत जास्त वापर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे केला जावा. प्रत्यक्ष बैठकीला केवळ अत्यावश्यक प्रकरणांमध्येच परवानगी दिली जाईल.

Travel Expense Cut : प्रवास खर्चावर निर्बंध

देशांतर्गत आणि परदेश दौऱ्यांवरही खर्च नियंत्रण ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परदेश दौरे अत्यावश्यक असल्यासच मंजूर केले जातील आणि शक्य तितक्या कमी खर्चात ते पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Government Expense Cut : कोणत्या संस्थांना लागू होणार नियम?

केंद्र सरकारचे हे निर्देश पुढील संस्थांना लागू असतील:

  • सरकारी बँका (PSBs)
  • प्रादेशिक ग्रामीण बँका (RRBs)
  • सरकारी विमा कंपन्या (PSICs)
  • सार्वजनिक क्षेत्रातील वित्तीय संस्था (PSFIs)

Energy Crisis Impact India : ऊर्जा संकटामुळे सरकारचा निर्णय

अमेरिका-इराण तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढत आहेत. त्याचा परिणाम भारताच्या ऊर्जा खर्चावर होत असल्याने केंद्र सरकारने विविध विभागांना काटकसरीचे उपाय तातडीने राबवण्यास सांगितले आहे.

Fuel Price Hike Impact India : भाजीपाल्यांचे दर वाढले

दरम्यान, डिझेलचा अपुरा पुरवठा आणि दरवाढ या दोन्हीचा परिणाम सर्वसामान्यांच्या जीवनावर होताना दिसतोय. यामुळे दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंना दरवाढीचा फटका बसताना दिसत आहे. राज्यभरात भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. बहुतांश भाज्यांचे दर प्रतिकिलो 80 ते 100 रुपयांच्या घरात आहेत. दूध, भाजीपाला आणि इंधनाचे दर वाढल्यानं सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आल्याचं चित्र आहे.

ही बातमी वाचा:

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
Advertisement

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Prashant Kishor On Sunil Tatkare Sunetra Pawar NCP Politics: प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिल्याच्या चर्चेनं राष्ट्रवादीत खळबळ; सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीत काय काय घडलं?
Embed widget