Gold Silver Rate Today, 3 January 2024 : नव्या वर्षात सोने-चांदीला (Gold-Silver) झळाळी मिळताना दिसत आहे. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासूनच सोने-चांदीच्या दरात चढ-उतार (Gold Silver Rate) पाहायला मिळत आहे. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ (Gold Rate Hike) दिसून आली. नववर्षातही पहिल्या दोन दिवसात सोन्याच्या दरात किंचित वाढ (Gold Rate Update) झाली. आज मात्र सोने-चांदीची (Silver Rate Today) किंमत स्थिर आहे.
जागतिक बाजारात सोन्याचे फ्युचर्स वाढले
फेडरल रिझर्व्हची नवीन धोरणांमुळे यूएस शेअर बाजार आणि जागतिक संकेतांचा परिणाम देशांतर्गत सोने-चांदीच्या दरावर दिसून येत आहे. आज बुधवारी, 3 जानेवारी रोजी देशांतर्गत फ्युचर्स मार्केटमध्ये सकाळच्या सत्रात सोन्याच्या किमती वाढल्याचं पाहायला मिळालं. देशांतर्गत शेअर बाजारातील चढउतार आणि भू-राजकीय बाबींचाही सोन्याच्या किमतीवर परिणाम झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमेरिकेच्या विविध महत्त्वाच्या आर्थिक उलाढाली पाहायला मिळणार असून याचा जागतिक बाजारावर परिणाम होणार आहे.
आज सोन्याचा दर काय?
आज 3 जानेवारी 2024 बुधवारी देशातील सराफा बाजारात सोन्याचे भाव जवळपास स्थिर आहेत. आज सोन्याच्या दरात जास्त बदल झालेला नाही. बहुतेक शहरांमध्ये सोन्याचा भाव 63,500 रुपयांच्या वर आहे. दिल्लीत 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर (24K Pure Gold rate) 64,240 रुपये आहे. मुंबईत सोन्याचा दर 64,090 रुपये आहे. चेन्नईत सोन्याचा दर 64,580 रुपये आहे. आज चांदीचा दर 78,900 रुपये किलो (Silver Price Today) आहे.
सोन्याचा भाव 70000 पार पोहोचणार
2024 मध्ये सोनं 70,000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे. चालू जागतिक आर्थिक अनिश्चितता आणि जागतिक राजकीय तणावामुळे सोन्याचा भाव यावर्षी प्रति 10 ग्रॅम 70,000 रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचेल, असे ऑल इंडिया जेम अँड ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सिल (GJC) ने म्हटले आहे.
दिल्लीतील आजचा सोन्याचा दर किती?
दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा भाव 58,900 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्यासाठी ग्राहकांना 64,240 रुपये प्रति 10 ग्रॅम मोजावे लागत आहेत.
मुंबईत आज सोन्याची किंमत
मुंबईत 22 कॅरेट सोन्याची किंमत 58,750 रुपये प्रति तोळा आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत 64,090 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईत सोन्याचा लेटेस्ट रेट काय?
चेन्नईमध्ये आज 22 कॅरेट सोन्याचा दर 59,200 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा दर 64,580 रुपये आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :