पुणे : ओबीसीमध्येच (OBC)  आरक्षण पाहिजे म्हणून काही नेते ताकद लावत आहेत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal)  यांनी मराठा आंदोल मनोज जरांगेंवर (Manoj Jarange)  केली आहे. अॅडव्होकेट जनरल यांच्याशी बोललो असून महाराष्ट्र सरकारतर्फे आणि आयोगातर्फे अॅफेडेव्हिट दाखल झालं असल्याचीही माहिती भुजबळांनी  दिली आहे. पुण्यात ते माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली .दोन महिन्यात जातगणना पूर्ण करा अशी छगन मागणी देखील भुजबळांनी केली आहे. 


छगन भुजबळ म्हणाले, सहा जानेवारीला पंढरपूर ओबीसी एल्गार मेळावा आहे.सात जानेवारीला राष्ट्रवादीचा कार्यक्रम आहे.  तिथे माझी उपस्थिती  आवश्यक आहे.  सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यासाठी जाणार आहे. भिडे वाड्याची तपासणी सुरू आहे असून काम लवकर व्हावं ही इच्छा आहे.  


ओबीसी समाजासाठी काम करण्याचं वेड मला लागलय : भुजबळ


छगन भुजबळ यांना वेड लागलं, मात्र लोकशाहीमध्ये सभा घेण्याचा त्यांना अधिकार असल्याचे मनोज जरांगे म्हणाले आहेत. या टीकेला उत्तर देताना छगन भुजबळ म्हणाले, मला वेड लागलंच आहे. ओबीसी समाजासाठी काम करण्याचं वेड मला लागलं आहे. तुम्ही घरोघरी सर्वेक्षण करा दोन दिवसात करा किंवा 15 दिवसात करा. तुम्ही  50 टक्के लोकांचे सर्वेक्षण १५ दिवसात करणार मग सगळ्यांचं करा, एक महिना अजून  लागेल.


सरकार आणि त्यांच्या कामात त्रुटी झाली : भुजबळ


महानंद  (Mahanand)डेअरी राज्यातून जाणार याविषयी बोलताना छगन भुजबळ म्हणाले, महानंदा डेअरी गुजरातकडे जाणार मी वाचलं.   सरकार आणि त्यांच्या कामात त्रुटी झाली आहे. महाराष्ट्रातून हे काम जावं अस मला वाटत नाही . 


महायुतीत कोणताही वाद नाही : भुजबळ


महायुतीतील जागावाटपाबद्दल बोलताना छगन भुजबळ म्हणाले, या बाबत तिन्ही पक्षांचे लोक एकत्र बसून ठरवतील. कुठलाही वाद नाही. जितकी ताकद असेल तसे वाटप होणार आहे.


मुख्यमंत्री महायुतीचाच होणार : भुजबळ


नरेंद्र मोदी यांचं वारे सगळीकडे आहे. तेच निवडून येतील . महायुतीचा मुख्यमंत्री होणार आहे. आता पण आमचाच महायुतीचा मुख्यमंत्री आहे म्हणजे शिंदे आहेत आमचेच आहेत, अशी प्रतिक्रिया देखील छगन भुजबळांनी दिली आहे. 


हे ही वाचा :


मोठी बातमी! आंतरवाली सराटीत एकही कुणबी नोंद नाही; जरांगेंचं कुटुंब आरक्षणापासून वंचित राहणार?