Gold-silver Rates today:भारतात आता सणावारांना सुरुवात झाली आहे. अनेकजण घरातील समारंभांसाठी सोन्याचांदीची खरेदी करण्यास पसंती देत आहेत. दरम्यान, सराफा मार्केटमध्ये सध्या सोन्याचांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची वरदळ वाढली आहे. महिन्याच्या शेवटी सोन्याचांदीच्या दरात काहीशी घसरण झाल्यानं ग्राहकांना दिलासा मिळाल्याचं चित्र आहे. मागील आठवड्यापासून सोन्याचांदीच्या दरात चढउतार सुरु असताना काल सोन्यासह चांदीच्या भावातही किंचित घसरण झाली आहे. त्यामुळे तोळ्यामागे आता ग्राहकांना किती रुपये द्यावे लागतील? १० ग्रॅमचा भाव काय? जाणून घेऊया आजचे ताजे भाव..


बुलियन मार्केटनुसार, मागील आठवड्यात सोन्याचांदीच्या भावात चढउतार दिसत होती. महिन्याभरापूर्वी असणाऱ्या सोन्याच्या भावात मागील आठवड्यात घट झाली होती. काल हा भाव किंचित घसरल्याचे पहायला मिळाले.


काय आहे सोन्याचा भाव?


ग्राहकांना जरी आज दिलासा मिळणार असला तरी सोन्याच्या किंमतीत केवळ ९० रुपयांची घसरण झाली आहे. 22 कॅरेट सोन्याच्या एका तोळ्याला आता ग्राहकांना 76,831 रुपये द्यावे लागतील. तर 10 ग्रॅम सोन्याची किंमत सध्या 65,872 रुपये झाली आहे.


24 कॅरेट सोनं सध्या तोळ्यामागे 83,816 रुपये असून  दहा ग्रॅमसाठी 71,860 रुपये ग्राहकांना मोजावे लागत आहेत.


चांदीचे आजचे भाव काय?


एक तोळा चांदीसाठी सध्या ग्राहकांना 992 रुपये मोजावे लागणार आहेत. तर दहा ग्रॅम चांदीचा भाव 851 रुपये झाला आहे. चांदीचा भाव मागील आठवड्यात 0.60% ने घसरला होता. तो आज 510 रुपयांनी घसरल्याची नोंद करण्यात आली आहे.


तुमच्या शहरात काय आहे भाव?


शहर      सोनं (10gm)     चांदी (kg)
मुंबई    71,730                 84920
पुणे      71,730                 84,920
नाशिक 71,730                84,920
औरंगाबाद71,730             84,920
नागपूर 71,730                 84,920


22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्यात फरक काय?


२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आहे आणि २२ कॅरेट अंदाजे ९१% शुद्ध असतं. २२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या ९% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. २४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.


हेही वाचा:


पाण्यासारखा पैसा असूनही साधेपणा कायम! ना अलिशान गाडी ना मोबाईल, कोण आहे हा असामान्य व्यक्ती?