Ajay Devgn and Kajol : बॉलिवड अभिनेत्री काजोल 90 च्या दशकातील सुपरस्टार अभिनेत्रींपैकी एक आहे. काजोलने तिच्या अवखळ स्वभाव आणि तिच्या दर्जेदार अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. तिने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली आहे. काजोलने आपल्या कारकिर्दीत प्रत्येक शैलीतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. वेगवेगळ्या भूमिका साकारत तिने चाहत्यांचे भरपूर मनोरंजन केलं आहे.


लग्न करण्याआधी 'या' अभिनेत्याच्या प्रेमात होती काजोल


काजोलच्या प्रोफेशनल लाईफसोबत तिचं पर्सनल लाईफही तितकंच चर्चेत राहिलं आहे. तिच्या वैयक्तिक आयुष्यतील काही रंजक किस्से आजही चर्चेत आहेत. काजोलने बॉलिवूड अभिनेता अजय देवगणसोबत लग्न केलं. पण, अनेकांना माहित नसेल की, अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी काजोलचा दुसऱ्या अभिनेत्यावर क्रश होता. काजोलच्या मनातील हा अभिनेता कोण होता ते जाणून घ्या.


करण जोहरकडून मोठी खुलासा


एकमेकांसोबत काम करता करता काजोल आणि अजय देवगण एकमेकांच्या प्रेमात पडले. काजोलने 1999 मध्ये अजय देवगणसोबत लग्न केलं. या जोडप्याला न्यासा आणि युग ही दोन मुले आहेत. पण, अजय देवगणसोबत लग्न करण्याआधी काजोलचं दुसऱ्या अभिनेत्या जिवापाड प्रेम होतं. याचा खुलासा काजोलचा जवळचा मित्र आणि दिग्दर्शक करण जोहरने केला होता. करण जोहरने काजोलच्या क्रशबाबत मोठा खुलासा केला होता, ज्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते.


करण जोहर आणि काजोल कॉमेडियन कपिल शर्माच्या शोमध्ये पोहोचले होते. यादरम्यान, अजय देवगणसोबत लग्नाआधी काजोलचा अक्षय कुमारवर क्रश होता, असा खुलासा करण जोहरने केला होता. करण जोहरने काजोलबाबत खुलासा करताना सांगितलं की, 'जेव्हा 'हिना' चित्रपटाचा प्रीमियर झाला, तेव्हा काजोल अक्षय कुमारचा क्रश होता. मला आठवतंय की ती संपूर्ण प्रीमियरमध्ये अक्षय कुमारला शोधत होती, म्हणून मी तिला यासाठी मदत करू लागलो. मी देखील त्यावेळी प्रीमियरमध्ये अक्षय कुमारला शोधत होतो. 


काजोल आणि अक्षय कुमार 'या' चित्रपटात एकत्र


काजोलच्या करिअरमध्ये तिला तिच्या क्रशसोबत काम करण्याची एक संधी मिळाली. काजोल आणि अक्षय कुमार यांनी आतापर्यंत त्यांच्या करिअरमध्ये फक्त एकाच चित्रपटात काम केलं आहे. काजोल आणि अक्षय कुमार यांनी 1994 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल्लगी' चित्रपटात एकत्र काम केलं होतं. यानंतर दोघांना एकत्र काम करण्याची संधी मिळाली नाही. काजोलने अजय देवगणसोबत तर अक्षय कुमारने ट्विंकल खन्नासोबत लग्न केलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Rajkummar Rao Birthday : एकेकाळी पार्ले-जी खाऊन काढले दिवस, आज आहे कोट्यवधींची मालक; वाचा अभिनेता राजकुमार रावचा खडतर प्रवास