एक्स्प्लोर

Gold Silver Rates Today:मध्यपूर्वेतील शांततेचा परिणाम की वादळापूर्वीची शांतता? सोने-चांदीचे दर घसरले; आजचा भाव किती? ही 5 कारणे 

जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम असून, सोने-चांदीच्या दरांमध्येही सावध व्यवहार पाहायला मिळत आहेत

Gold Silver Rates Today: गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर सोने चांदीच्या (Gold Silver Rates) किमतींवर प्रचंड दबाव आहे. इराण, इस्रायल अमेरिकेच्या तणावाचा फटका  जगभरातील गुंतवणूकदारांना बसतोय. भूराजकीय परिस्थिती, बदलती राजकीय गणिते आणि इराण अमेरिकेच्या संघर्षाचा एकत्रित परिणाम सध्या सोने चांदीवर होतोय. देशांतर्गत बाजारात चांदी आठवड्याभरात जवळपास 20,450 रुपयांनी घसरलीय. आज किलोमागे चांदीचा दर  246,710 रुपये प्रति किलोवर आली. तर  सोने मागील आठवड्याच्या तुलनेत 4390 रुपयांनी घसरून 154,810 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. विशेष म्हणजे, सोमवारीही मौल्यवान धातूंमध्ये मोठी घसरण झाली होती. चांदीच्या किमती जवळपास 7 टक्क्यांनी कोसळल्या होत्या, तर सोन्याच्या दरात 2 टक्क्यांहून अधिक घट झाली होती. त्यामुळे मध्यपूर्वेतील शांततेचा हा परिणाम आहे की वादळापूर्वीची शांतता याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे.

Gold Silver Rates:सोने चांदीचा आजचा दर किती?

बुलीयन्स असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 10 gm सोन्यासाठी ग्राहकांना 1 लाख 54 हजार 810 रुपये मोजावे लागतील. हे दर  GST शिवाय आहेत, शहरानुसार यात बदल होतात. तर चांदीचा आजचा दर 246,710 प्रति किलो झाला आहे. 

Gold Silver Drop Reasons:सोने चांदीच्या दरात चढउतार होण्याची करणे काय?

1. तज्ञांच्या माहितीनुसार, इराण-इस्रायल संघर्षविराम किती काळ टिकेल याबाबत अद्याप अनिश्चितता आहे. त्यामुळे व्यापारी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीचे निर्णय घेण्यास टाळाटाळ करत आहेत.

2.दरम्यान, सोमवारी इराण आणि इस्रायलने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आवाहनानंतर संघर्षविरामाची घोषणा केली. मात्र, इराणने इशारा देताना म्हटले आहे की, लेबनॉनमधील हिझबुल्लाहच्या ठिकाणांवर इस्रायलने हल्ले सुरू ठेवल्यास ते पुन्हा लष्करी कारवाई करू शकतात. त्यामुळे 

3.भूराजकीय तणाव कमी झाल्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीवरील मागणी कमी झाली असून, त्यामुळे दोन्ही धातूंच्या किमतींवर दबाव कायम आहे. बाजारातील गुंतवणूकदार आता मध्यपूर्वेतील घडामोडींसह महागाई आणि व्याजदरांबाबतच्या संकेतांवर लक्ष ठेवून आहेत.

4.याशिवाय, या आठवड्यात जाहीर होणाऱ्या अमेरिकेच्या महत्त्वाच्या महागाईच्या आकडेवारीकडेही बाजाराचे लक्ष लागले आहे. या आकडेवारीतून अमेरिकेची मध्यवर्ती बँक म्हणजेच Federal Reserve व्याजदरांबाबत पुढे कोणती भूमिका घेऊ शकते, याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सध्या वेट अँड वॉच भूमिका घेत आहेत. 

5. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मे महिन्यात देशातील नागरिकांनी वर्षभरात सोने खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. यानंतर सराफा व्यावसायिकांकडून देशवासियांना जुनं सोनं जमा करुन नवं सोनं खरेदी करावं म्हटलं होतं. त्यामुळे ग्राहकांनी जुने सोने मोडण्यास सुरुवात केल्यानं बाजारातील सोने वाढले आहे. याशिवाय भारतानं सोने आयातीवरील शुल्क वाढवल्याचा देखील परिणाम सोन्याच्या आयातीवर झाला. याच कारणांमुळे जागतिक बाजारात अनिश्चिततेचे वातावरण कायम असून, सोने-चांदीच्या दरांमध्येही सावध व्यवहार पाहायला मिळत आहेत

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Gold Silver Rate: सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
सोन्याची जोरदार मुसंडी, चांदीचे दर 'जैसे थे'; खरेदी करण्यासाठीची योग्य वेळ कोणती? दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ?
Virat Kohli Anushka Sharma Buys Luxury Apartment In Mumbai: अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
अलिबागनंतर थेट लंडनला गाठलं अन् आता पुन्हा मुंबईत; अनुष्का-विराटची रिअल इस्टेट मोठी गुंतवणूक, कुठे खरेदी केली कोट्यवधींची प्रॉपर्टी?
PNG Jewellers : पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
पीएनजी ज्वेलर्सचा FY27 च्या पहिल्या तिमाहीत निव्वळ नफा 105 कोटी रुपयांवर पोहोचला, शेअरमध्ये जोरदार तेजी
Kalind Limited : 15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
15 रुपयाच्या खालील स्मॉल-कॅप स्टॉक, आफ्रिकेत व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी 'कलींद लिमिटेड'ची यूकेच्या कंपनीसोबत मोठी भागीदारी
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Allegations Against Mangesh Jagtap Baramati: रिसॉर्ट बूक केलं, तारीख काढली, मला बघताच पळतो...; मंगेश जगताप यांच्यावर गंभीर आरोप, राष्ट्रवादीतील तरुणी थेट जिल्हा परिषदेच्या सभेत पेट्रोल घेऊन घुसली, पुण्यात खळबळ!
Parliament Monsoon Session Special Report : धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा,संसदेचे कामकाज वारंवार तहकूब
Insta E20 Janta Party Special Report : सीजेपीला मिळालेलं यश E20 जेपीला मिळणार?
MPSC FDA Paper Leak Special Report : नीट, टीईटीनंतर औषध निरीक्षक परीक्षेचा पेपर फुटला?
Sanjay Raut PC : मोदी-शाहांचा आदेश आल्यावर फडवीसांना केंद्रीय शिक्षणमंत्री व्हावंच लागेल
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime News: म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
म्हशीच्या गोठ्यात प्रियकरानं माजी सरपंच महिलेचा गळा आवळला, कोल्हापूरमधील अनैतिक संबंधांचा भयानक शेवट, कारची डिक्की उघडताच पोलीस चक्रावले
NCP Merger Talking: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत दिल्लीत मोठी घडामोड, मोदी-पवारांच्या भेटीच्या दुसऱ्याच दिवशी चक्रं फिरली, नेमकं काय घडलं?
Yugendra Pawar on Ajit Pawar Death: आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
आमचा संयम सुटत चाललाय, आम्हाला उत्तर पाहिजे...; अजित पवार विमान दुर्घटनेच्या चौकशीवर युगेंद्र पवार स्पष्ट बोलले, काय-काय म्हणाले?
Chitrakoot Crime News: सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
सुट्टीदिवशी दोघे टेकडीवर भेटले; रील बनवलं; तीन नराधमांनी वनविभागाचे कर्मचारी म्हणून धमकावत तरूणीसोबत नको ते केलं
Vishwas Nangare Patil: आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
आधीच काही इनपुट मिळालेले; हॉटेल ताजचा नकाशा डोक्यात होता , २६/११ च्या रात्री नेमकं काय घडलं? विश्वास नांगरे पाटलांनी काय सांगितलं?
Usha Mangeshkar on Asha Bhosle: आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
आशाताईंच्या निधनानंतर मंगेशकर कुटुंबावर दु:खाचा डोंगर, धाकट्या भगिनी उषा मंगेशकर म्हणाल्या, 'आम्ही कधीही तिच्या फोटोला हार घातला नाही...'
Ulhasnagar Crime News: घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
घराशेजारी राहणाऱ्या मुलावर प्रेम, मुलीने पळून जाण्याची केली तयारी; पुढे आईने जे केलं, संपूर्ण उल्हासनगर हादरलं!
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Maharashtra Live blog updates: पंतप्रधान मोदी मातीची गणेशमूर्ती बनवायला सांगतात, मग तुम्ही विसंगत भूमिका का घेता? हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल
Embed widget