एक्स्प्लोर

Gold Silver Rate Update : सोन्याच्या दरात पाच दिवसात 5 हजारांची घसरण, चांदीचे दर 20 हजारांनी कोसळले, सोने चांदीच्या दरात घसरण कशामुळं?

Gold Silver Rate Update :  सोने आणि चांदीच्या दरात या आठवड्यात मोठी घसरण झाली आहे, सोन्याचा दर 5228 रुपयांनी तर चांदीचा दर 20092 रुपयांनी कमी झाला आहे. 

Gold Silver Rate नवी दिल्ली : सोने आणि चांदीच्या दरात गेल्या 5 दिवसांमध्ये मोठी घसरण झाली आहे. 24  कॅरेट सोन्याचे दर पाच दिवसात  150169 रुपयांवरुन कमी होऊन 144941 रुपयांवर आले आहेत. म्हणजेच सोन्याचा दर 5228 रुपयांनी घटला आहे. चांदीच्या दरात देखील या आठवड्यात मोठी घसरण झाली आहे. चांदीचा दर 2.51 लाख रुपयांवरुन कमी होऊन 2 लाख 30 हजार 982 रुपयांवर आला आहे. म्हणजेच एक किलो चांदीच्या दरात 20029 रुपयांची घसरण झाली आहे.

सोने दरात घसरण कशामुळं? 

आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीचा दर गेल्या एक आठवड्यात 1 टक्क्यांनी कमी झाला आहे. याचा परिणाम देशातंर्गत बाजारात देखील पाहायला मिळत आहे. याशिवाय डॉलर निर्देशांक सातत्यानं मजबूत होत आहे. शुक्रवारी डॉलर निर्देशांक 1 वर्षाच्या उच्चांकावर पोहोचला होता. जेव्हा जेव्हा डॉलर निर्देशांकात अशी स्थिती निर्माण होते तेव्हा सोने आणि चांदीच्या दरात घसरण होते. लोक सोने आणि चांदीतील गुंतवणुकीऐवजी डॉलरमधील गुंतवणुकीला प्राधान्य देतात.

इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनच्या रिपोर्टनुसार शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा दर   144941 रुपये प्रति 10 ग्रॅमवर होता.  23 कॅरेट सोन्याचा दर 144361 रुपये, 22 कॅरेट सोन्याचा दर 132766 रुपये, 18 कॅरेट सोन्याचा दर 108706 रुपये आणि 14 कॅरेट सोन्याचा दर 84791 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या स्तरावर होता. चांदीचा दर शुक्रवारी 230982 रुपये प्रति किलो होता. इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनकडून शनिवार आणि रविवारी सोने आणि चांदीचे दर जाहीर केले जात नाहीत. 

सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना गेल्या वर्षात चांगला परतावा मिळाला आहे. डिसेंबर 2024 मध्ये 75 हजारांवर असलेले सोन्याचे दर 2026 च्या जानेवारी महिन्यात 1 लाख 75 हजार रुपयांपर्यंत पोहोचले होते. तर, चांदीच्यादरानं देखील डिसेंबर 2024 पासून 96 हजारांवरुन जानेवारी 2026 पर्यंत चार लाखांचा टप्पा गाठला होता. त्या तुलनेत सध्या सोने आणि चांदीच्या दरात घसरण झाली आहे. 

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धामुळं निर्माण झालेली स्थिती, परकीय चलनाचा साठा याचा विचार करता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षभरात सोने आणि चांदी खरेदी करु नये असं आवाहन केलं होतं. यानंतर केंद्र सरकारनं सोने आयातवरील शुल्क देखील वाढवलं होतं. यामुळं सोने आयातीवर परिणाम होत, आयातीमध्ये घट झाली आहे.

दरम्यान, इंडिया बुलियन्स ज्वेलर्स असोसिएशनकडून दिवसातून दोन वेळा दर जाहीर केले जातात. दुपारी 12 वाजता आणि सायंकाळी 5 वाजता सोमवार ते शुक्रवार या पाच दिवसांमध्ये दर जाहीर केले जातात. सोने आणि चांदीचे हे दर जीएसटीशिवायचे असतात.  

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Closing Auction Session : शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
शेअर बाजारातील बंद भाव ठरवण्याच्या पद्धतीत मोठा बदल; गुंतवणूकदारांवर काय परिणाम होणार?
ED Chief Rahul Navin : ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
ईडीचे प्रमुख राहुल नवीन यांचा कार्यकाळ एका वर्षानं वाढवला, मोदी सरकारचा मोठा निर्णय
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
देशातील सर्वात मोठ्या बँकेत नोकरीची संधी, 1 हजार 538 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु, कसा कुठे कराल अर्ज? 
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला सोने खरेदीदारांना मोठा झटका, पाच दिवसातच दरात सात हजारांची वाढ तर चांदीच्या दरात 14 हजारांची वाढ
Advertisement

व्हिडीओ

Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Hardik Pandya Trade : हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
हार्दिक पांड्याला घेण्यासाठी संघांची पैशांची जुळवाजुळव, पण मुंबई इंडियन्सने अद्याप पत्तेच उघडले नाहीत! KKR-CSKच्या प्लॅनला ब्रेक, नेमकं काय घडलं?
Amrapali Dubey: प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
प्रसिद्ध अभिनेत्रीला लग्न करायचं नाही, पण आई व्हायचंय; लेकीच्या निर्णयानं वडील नाराज; म्हणाले, 'समाज...'
Embed widget