एक्स्प्लोर

Gold Silver Rate: सोने-चांदीच्या दरात किरकोळ घसरण! घसरणीमागील मुख्य कारणे समोर; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे दर

Gold Silver Rate: आज भारतात चांदीचा दर 249.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 2,49,900 रुपये प्रति किलोग्राम इतका आहे.

Gold Silver Rate: भारतीय सराफा बाजारात आज सोने आणि चांदीच्या दरांमध्ये घसरण नोंदवली गेली आहे. सोने चांदीचे भाव आज काहीसे घसरले आहेत. काल (बुधवारी, ता 9) वायदा बाजारात सोन्याच्या (Gold Silver Rate) किमतीत 190 रुपयांपर्यंतची तेजी पाहायला (Gold Silver Rate) मिळाली होती. मात्र, आज 10 सप्टेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे.(Gold Silver Rate)

Gold Silver Rate: सोन्याचे आजचे दर

'गुडरिटर्न्स'च्या (Goodreturns) अहवालानुसार, आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,54,300 रुपये इतका आहे. कालच्या तुलनेत यामध्ये 10 रुपयांची किरकोळ घसरण झाली आहे. याचप्रमाणे 22 कॅरेट सोन्याचा भावदेखील कालच्या तुलनेत 10 रुपयांनी घसरून आज 1,41,440 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,15,720 रुपये असून यातही 10 रुपयांची कपात झाली आहे.(Gold Silver Rate)

Gold Silver Rate: प्रमुख शहरांमधील 24 कॅरेट सोन्याचे दर (प्रति ग्रॅम):

दिल्ली - 15,445 रुपये
मुंबई - 15,430 रुपये
बेंगळुरू - 15,430 रुपये
चेन्नई - 15,430 रुपये
कोलकाता - 15,430 रुपये
पुणे - 15,430 रुपये
जयपूर - 15,556 रुपये
लखनौ - 15,556 रुपये
पाटणा - 15,556 रुपये

Gold Silver Rate: आज सोन्याच्या किमती का घसरल्या?

आंतरराष्ट्रीय बाजारात नफा वसुली (Profit Booking) आणि विक्री वाढल्यामुळे सोन्याच्या दरांवर दबाव निर्माण झाला आहे. सध्या जागतिक गुंतवणूकदार अत्यंत सतर्क भूमिका घेत आहेत, कारण सर्वांचे लक्ष अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या (US Federal Reserve) आगामी बैठकीतील व्याजदरांच्या निर्णयाकडे लागले आहे. व्याजदरातील संभाव्य बदलांच्या अनिश्चिततेमुळे ट्रेडर्स सोने-चांदीतील पैसा काढून सुरक्षित पर्यायांचा शोध घेत आहेत. अमेरिकन फेड रिझर्व्हची पुढील बैठक 15 आणि 16 सप्टेंबर 2026 रोजी होणार आहे.

याशिवाय, 'डॉलर इंडेक्स'मधील (Dollar Index) मजबुती हेदेखील सोन्याचे दर घसरण्याचे एक मोठे कारण आहे. जेव्हा जेव्हा अमेरिकन डॉलर मजबूत होतो, तेव्हा जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या किमतींवर दबाव येतो. डॉलर मजबूत झाल्याने इतर चलनांचा वापर करणाऱ्यांसाठी सोने खरेदी करणे महाग होते, ज्यामुळे तात्पुरती मागणी घटते.

तसेच, सोने ही एक 'नॉन-यील्डिंग ॲसेट' (Non-Yielding Asset) आहे, म्हणजेच यावर बँकेच्या एफडी किंवा सरकारी बाँड्सप्रमाणे कोणताही निश्चित व्याज किंवा लाभांश (Dividend) मिळत नाही. त्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता निर्माण झाल्यावर गुंतवणूकदार सोने विकून आपला पैसा काढून घेतात.

Gold Silver Rate:  आजचा चांदीचा भाव

आज भारतात चांदीचा दर 249.90 रुपये प्रति ग्रॅम आणि 2,49,900 रुपये प्रति किलोग्राम इतका आहे. आज चांदीच्या दरात प्रति ग्रॅम 0.10 पैशांची घसरण झाली असून, त्यानुसार प्रति किलोचा भाव 100 रुपयांनी कमी झाला आहे. दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, वडोदरा आणि अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये आज चांदीचा दर प्रति 10 ग्रॅम 2,499 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये चांदीचा दर किंचित जास्त म्हणजेच प्रति 10 ग्रॅम 2,549 रुपये नोंदवला गेला आहे.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
NCMC Card : एसटी महामंडळाचा मोठा निर्णय, एनसीएमसी कार्डचा रिचार्ज  5 रुपयांच्या पटीत करता येणार, नवी अपडेट जाणून घ्या
NCMC कार्डच्या रिचार्जच्या नियमात मोठा बदल, एसटी प्रवाशांना दिलासा
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Gold Silver Rate: सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
सोन्याचे दर 'जैसे थे', पण चांदी 3000 रुपयांनी महागली; लग्नसराईत दरांकडे लक्ष, जाणून घ्या आजचे सोने चांदीचे भाव
Advertisement

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hinjewadi Crime News: साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
साडेतीन वर्षांचे प्रेमसंबंध; तीन महिन्यांपासून वाद, रागात प्रेयसीचं डोकं आधी भिंतीवर मग बेडवर आपटलं... इन्फोसिसच्या शुभमने विप्रोच्या कोमलला संपवलं अन्...
Sunetra Pawar and Supriya Sule: यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
यशवंतराव चव्हाणांचा स्मृतीदिन; साताऱ्यात सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळे एकाच मंचावर, नतमस्तक होत चर्चा, नेमकं काय घडलं?
Sunil Tatkare on Konkan new district: कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
कोकणात नव्या जिल्ह्याची निर्मिती झाल्यास मुख्यालय कुठे? सुनील तटकरेंचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, म्हणाले....
Mumbai Andheri Police station: अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
अंधेरी पोलीस ठाण्यात नाट्यमय घडामोडी, वरिष्ठ अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरनंतर फटाके वाजवणाऱ्या त्या महिला कॉन्स्टेबलचीही बदली, नक्की काय घडलं?
Naigaon Vasai News: आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
आईच्या मृत्यूचा घाव ताजा असतानाच काळाचा दुसरा घाला; हॉस्टेलला जाण्याच्या आदल्या दिवशी सहा वर्षांच्या चिमुरड्याचा 11व्या मजल्यावरून पडून मृत्यू
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
एकनाथ शिंदे म्हणजे संपूर्ण शिवसेना नाही; सिब्बल यांचा युक्तिवाद, आजच्या सुनावणीकडे देशाचं लक्ष, गेल्या सुनावणीत नेमकं काय घडलेलं?
Embed widget