मुंबई : बुधवारी बाजार बंद होताना चांदीच्या भावात काही किरकोळ चढ-उतार पहायला मिळाली तर सोन्याच्या भावात कोणताही बदल दिसून आला नाही. आज गुरुवारी, मुंबई आणि पुण्यात आज 22 कॅरेटच्या सोन्याचा भाव हा 47,680 रुपये इतका आहे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव हा 48,680 रुपये इतका आहे. आज एक किलो चांदीचा भाव हा 71,400 रुपये इतका आहे. चांदीच्या भावात 300 रुपयांची घसरण झाल्याचं दिसून आलंय.
गेल्या काही दिवसांचा विचार करता स्थिर असलेले सोन्याचे भाव हे बदलत आहेत. 1 जून रोजी सोन्याचा भाव हा 47,900 रुपये इतका होता. 2 जून रोजी त्यामध्ये 1330 रुपयांची वाढ झाली आणि तो 49,230 रुपयांवर पोहोचला. त्यानंतर सोन्याच्या भावात कमी अधिच चढ-उतार पहायला मिळाले. गेली दोन दिवस सोन्याच्या भावात कोणताही बदल दिसत नाही.
बुधवारी चांदीचा दर हा 71,700 रुपये इतका होता. आज त्यामध्ये 300 रुपयांची घसरण झाली असून ती किंमत 71,400 रुपयांवर पोहोचली आहे. चांदीच्या भावाचा विचार करता गेल्या दहा दिवसात या दरात चढ-उतार दिसत आहे. 1 जून रोजी चांदीचा भाव हा 72,600 रुपये इतका होता. नंतर त्यामध्ये कमी अधिक चढ उतार होत राहिली. मंगळवारी चांदीच्या भावात 700 रुपयांची वाढ झाली होती. मंगळवारी चांदीचा दर हा 71,700 इतका होता. आज तो दर 71,400 रुपये इतका आहे.
मुंबईतील सोन्याच्या भावावर आंतरराष्ट्रीय दराचा जरी फरक पडत असला तरी काही स्थानिक गोष्टीही प्रभाव टाकतात. इंडियन बुलियन ज्वेलर्स असोसिएशनकडून मुंबईतील सोन्याचा दर ठरवला जातोय. त्यामध्ये स्थानिक आयात कर आणि MCX या कमोडिटी मार्केटचा विचार केला जातो. MCX हे देशातील सर्वात मोठे कमोडिटी मार्केट असून या ठिकाणी सोन्याचा भाव ठरवला जातो.
ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याच्या भावाने प्रती 10 ग्रॅमसाठी 56 हजार रुपयांचा विक्रमी आकडा गाठला होता. त्यानंतर सोन्याच्या भावामध्ये आता जवळपास नऊ हजारांहून जास्त रुपयांची घसरण झाल्याची पहायला मिळतंय.
महत्वाच्या बातम्या :
- Malad Building Collapse : मुसळधार पावसामुळे मुंबईतील मालाडमध्ये इमारतीचा भाग कोसळला; 11 जणांचा मृत्यू, 17 जण गंभीर
- Maharashtra Corona Cases : राज्यात आज 10,989 नवीन रुग्णांचे निदान; तर 16,379 रुग्ण कोरोनामुक्त
- Tanmay Fadnavis Vaccination : तन्मय फडणवीसने आरोग्य कर्मचारी म्हणून लस घेतल्याचं माहिती अधिकारात उघड