मुंबई : राज्यात आज कोरोना रुग्णसंख्येत कालच्या तुलनेत काहीशी वाढ पाहायला मिळाली आहे. तसेच आज कालपेक्षा अधिक मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज 10 हजार 989 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 16 हजार 379 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. काल राज्यात 10219 रुग्णांची नोंद झाली होती.  


कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या आता 55,97,304 इतकी झाली आहे तर रिकव्हरी रेट 95.45 टक्के झाला आहे. आज 261 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आज एकूण 1,61,864 सक्रीय रुग्ण आहेत. सध्या राज्यात 11,35,347 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 6,494 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यातील पाच महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यात 10 पैक्षा कमी रुग्णांची नोंद झाली आहे. 


मुंबईत गेल्या 24 तासात 788 रुग्णांची नोंद


मुंबईत गेल्या 24 तासात 788 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 511 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर मुंबईत आज 27 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 6 लाख 80 हजार 520 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 95 टक्के आहे. सध्या मुंबईत 15 हजार 947 सक्रीय रुग्ण आहेत. रुग्ण दुप्पटीचा दर 553 दिवसांवर गेला आहे.  


खालील जिल्हे, महापालिका क्षेत्रात कोरोना रुग्णसंख्या एक आकडी


उल्हासनगर मनपा- 4
भिवंडी निजामपूर मनपा- 6
मालेगाव- 3
परभणी मनपा- 3 
भंडारा


अनेक जिल्हे आणि महापालिका क्षेत्रात एकही मृत्यू नाही


ठाणे, मीरा भाईंदर मनपा, मालेगाव मनपा, अहमदनगर मनपा, धुळे, धुळे मनपा, जळगाव मनपा, नंदूरबार, पिंपरी चिंचवड मनपा, सोलापूर मनपा, हिंगोली, लातूर, लातूर मनपा, नांदेड मनपा, अकोला, अमरावती मनपा, यवतमाळ, बुलडाणा, नागपूर, भंडारा, चंद्रपूर मनपा, गडचिरोली याठिकाणी एकाही मृत्यूची नोंद नाही. 


देशभरातील कोरोनाची सद्यस्थिती


सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या आत आल्याने काहीसा दिलासा मिळत असल्याचं चित्र आहे. गेल्या 24 तासात देशात 92 हजार 596 नवीन रुग्णांची भर पडली असून 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवसात देशातील एक लाख 62 हजार 664 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत, म्हणजे एकाच दिवसात 72,287 सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.