Gold Silver Price News : सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Price) सातत्यानं वाढ होत असल्याचं चित्र दिसत आहे. यामुळं सामान्य ग्राहकांच्या खिशावर मोठा परिणाम होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. दरम्यान, काल (13 सप्टेंबर) चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. काल एकाच दिवसात बुलढाणा (Buldhana) जिल्ह्यातील खामगाव (Khamgaon) येथील प्रसिद्ध चांदीच्या बाजारपेठेत चांदीच्या दरात (Silver Price)  तब्बल 4400 रुपयांची वाढ झाल्याचे दिसून आलं आहे. 


चांदीचा दर हा 87 हजार रुपये प्रति किलोवर


अमेरिकेतील अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून काल चांदीच्या दरात एकाच दिवसात 4400 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळं सध्या चांदीचा दर हा 87 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. तर सोन्याच्या भावातही 1 हजार रुपयांची वाढ झाली असून सोने 73 हजार 900 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी दरवाढ झाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चढ-उतार सुरू असलेल्या सोन्या-चांदीच्या भावात काल मोठी वाढ झाल्याचे दिसून आली आहे. अमेरिकेतील अर्थव्यवस्था डळमळीत झाली असून बँकांचे व्याजदर आणखी कमी होण्याचे संकेतही तज्ञांनी दिले आहेत.


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ


एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होतक असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.  येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


देशांतर्गत बाजारात दोन्ही मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ अशा वेळी झाली आहे जेव्हा परदेशातही त्यांच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळं सध्या सोन्याची खरेदी करणं सर्वसामान्य लोकांना परवड नाही. मोठे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोने-चांदीची खरेदी करत आहेत, त्यामुळे दिवसेंदिवस सोन्याच्या दरात वाढ होत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


गोल्ड बाँडमध्ये गुंतवणूक करण्यांवर पैशांचा पाऊस, मिळणार तब्बल 150 टक्क्यांनी रिटर्न्स; RBI ने नेमका काय निर्णय घेतला?