Gold Price News : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात  (Gold Silver Price) मोठी वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. MCX वर सोन्याचे दर 70 हजार रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. सोन्याचा दर हा 69805 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर हा 80000 रुपयांच्या आसपास म्हणजे 79411 रुपयांवर गेला आहे. त्यामुंळ सोनं खरेदी करणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. सध्या लग्नसराईचा हंगाम सुरु आहे. अशातच सोन्याचे दर वाढत आहेत. नेमकी दरात का वाढ होत आहे, याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात. 


का वाढतायेत सोन्याचे दर?


सध्या सोनं खरेदी करणं अवघड झालं आहे. कारण सोन्याने 70000 रुपयांचा टप्पा गाठला आहे. फेब्रुवारी महिन्यात अनेक केंद्रीय बँकांच्या सोने भांडारात 19 टन सोनं वाढलं आहे. यामध्ये सातत्यानं वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. बँका मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी करत असल्याचे चित्र दिसत आहे. यामुळं दरावर परिणाम होत असल्याचं बोलंल जात आहे. पिपल्स बँक ऑफ चायना ही बँक सोन्याची सर्वात मोठी खरेदीदार आहे. या बँकेत सोन्याच्या भंडारात 2257 टन सोने आहे. गेल्या 16 महिन्यापासून सातत्यानं त्यामध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळालं आहे. नॅशनल बँक ऑफ कझाकिस्तानमध्ये फेब्रुवारी महिन्यात 6 टन सोन्याची वृद्धी झाली आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सोने भंडारातही 6 टन सोन्याची वृद्धी झाली आहे. दरम्यान, यूएस फेडरल रिझर्व्हच्या दरात कपात होण्याची शक्यता आहे, त्यामुळं सोने चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच गुढीपाडव्याचा सण जवळ आलाय, त्यामुळं मागणीत वाढ होतेय, त्यामुळं दरात वाढ होत आहे.  


सोन्याच्या दरात 6 महिन्यात 23 टक्क्यांची वाढ


MCX वर सातत्यानं सोन्याच्या दरात वाढ होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार MCX वर सोन्याचे दर गेल्या 6 महिन्यात 23 टक्क्यांनी वाढले आहेत. दरातील ही वाढ मोठी मानली जात आहे. तसेच अनेक लोक गुंतवणूक करण्यासाठी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात करत आहेत. सोन्याच्या दरात वाढ होत असल्यानं सोन्यात केलेली गुंतवणूक ही फायदेशीर ठरत आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Gold Price: व्यापाऱ्यांची भीती अखेर खरी ठरली, सोनं महागलं, गुढीपाडव्यापूर्वी प्रतितोळा दर 75 हजारांचा दर गाठणार?