Onion Export News : सध्या राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी (Onion Farmers) संकटात आहे. कारण कांद्याच्या दरात (Onion Price) सातत्यानं घसरण होत आहे. तसेच सध्या कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) देखील आहे. त्यामुळं दर घसरत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशात सरकारनं संयुक्त यूएईला म्हणजेच संयुक्त अरब अमीरातीला (United Arab Emirates) अतिरिक्त 10000 टन कांदा निर्यात करण्याचा निर्णय घेतलाय. परकीय व्यापार महासंचालनालयाने (DGFT) याबाबतचे आदेश जारी केलेत. दरम्यान, या निर्णयाचा शेतकऱ्यांना किती फायदा होणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी
केंद्र सरकारनं 8 डिसेंबर 2023 रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी (Onion Export Ban) घातली होती. ही बंदी 31 मार्चपर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते. मात्र, 31 मार्चनंतर देखील कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम आहे. मात्र, मित्र देशांना काही प्रमाणात कांद्याच्या निर्यात केली जात असल्याचे दिसत आहे. संयुक्त अरब अमीरातीला 10000 टन कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलीय. दरम्यान, मित्र देशांना आत्तापर्यंत सरकारनं 79,150 टन कांद्याची निर्यात केलीय.
कांदा निर्यातीमुळं दरात वाढ होईल का?
दरम्यान, या कांदा निर्यातीमुळं दरात वाढ होईल का? असा सवाल उपस्थित केला जातोय. याबाबत तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार,कांद्याची निर्यात ही मर्यादीत आहे, त्यामुळं सरकारच्या या निर्णयाचा शेतकऱ्यंना फारसा फायदा होणार नल्याची माहिती तज्ज्ञांनी दिलीय. सध्या अनेक शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा आहे. मात्र, निर्यातबंदीमुळं दराच घसरण झालीय. आता काही प्रमाणात निर्यात करण्यात येणार आहे, मात्र ती देखील मर्यादीत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना याचा फार काही फायदा होईल असं वाटत नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.
सरकारनं का केली निर्यातबंदी?
अल निनोच्या प्रभावामुळं मागील वर्षी पावसाचं प्रमाण कमी राहिलं आहे. यामुळं अनेक ठिकाणी दुष्काळी परिस्थिती निर्माण झालीय. तसेच दुसरं कारण म्हणजे देशातील बाजारात स्वस्त दरात कांदा उपलब्ध व्हावा हा सरकारचा उद्देश आहे. किंमतीवर निंयत्र राहावं यासाठी सरकारनं खबरदारी म्हणून कांद्याची निर्यातबंदी केली आहे. मात्र, या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. 4000 रुपये प्रतिक्विंटलवर आलेला दर सध्या 800 ते 1200 रुपयांच्या दरम्यान आला आहे. यामुळं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.
महत्वाच्या बातम्या: