Bangles: स्त्रियांच्या हातातील बांगड्या (Bangles) फक्त त्यांचे सौंदर्य वाढवत नाही तर त्यांचे होणारे फायदे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. सौभाग्यवती महिलांसाठी बांगड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. काचेची बांगडी असो किंवा सोने-चांदी, श्रृंगारात या बांगड्यांना विशेष महत्त्व आहे.सोन्या चांदीच्या बांगड्यांना शास्त्रात महत्त्व आहे. बांगड्याच्या घर्षणामुळे त्यांचे अस्तित्व शरीरात जाते आणि स्वस्थ राहतो. मात्र त्याचबरोबर काचेच्या बांगड्यांना सुद्ध शास्त्रात अनन्य साधारण महत्त्व देण्यात आले आहे. मात लक्ष्मीला काचेच्या बांगड्या अतिशय प्रिय आहे. त्याचबरोबर सर्व देवी देवतांनी काचेच्या बांगड्या घातल्याचा उल्लेख आहे. त्यामुळे राशीनुसार काचेच्या बांगड्या निवडल्या तर तुम्हाला निश्चित फलप्राप्ती होईल आणि पतीचे भाग्य चमकते. पत्नीने घातलेल्या बांगड्याशी पतीच्या उन्नतीचा संबंध असतो असे शास्त्र सांगते. त्यामुळे तुम्ही योग्य रंगानुसार बांगड्या घातल्या तर निश्चितच पतीची भरभराट होईल यात शंकाच नाही.
काचेच्या बांगड्या घातल्याने घरातील नकारत्मकता दूर जाते आणि घरात सुख, समृद्धी नांदते. मेटल किंवा प्लास्टिकच्या बांगड्या कधीत घालू नये कारण त्या नकारत्मकतेला निमंत्रण देताता. शास्त्रात बांगड्याचे तत्त्व आणि राशीनुसार बांगड्यांचे रंग सांगितले आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की राशीनुसार पत्नीने कोणत्या रंगाच्या बांगड्या घालव्यात म्हणजे पतीची भरभराट होईल.
कोणत्या राशीच्या महिलांनी कोणत्या बांगड्या घालाव्यात? (Which Rashi Should Wear Which Colour)
मेष (Aries) - लाल रंग
पतीचे नशीब चमकते. किमान दोन लाल रंगाच्या बांगड्या तरी मेष राशीच्या महिलांनी घालाव्यात.
वृषभ (Taurus) - सोनेरी
वृषभ राशीच्या महिलांनी गोल्डन म्हणजे सोनेरी रंगाच्या बांगड्या घालाव्यात. त्यात तुम्ही पितळाच्या किंवा सोन्याच्या बांगड्या देखील घालू शकता. त्यामुळे तुमच्या पतीच्या करिअरचा आलेख कायम उंचावत जाईल.
मिथुन (Gemini) - गुलाबी
गुलाबाप्रमाणे त्यांचे आयुष्य कायम टवटवीत राहते त्यामुळे निश्चित पतीचे आयुष्य चमकते
कर्क (Cancer) - नारंगी, पिवळा
पतीच्या भविष्याला आकार मिळतो. प्रगतीचे दरवाजे कायमच खुले राहतात
सिंह (Leo) - हिरव्या
हिरव्या रंगाच्या बांगड्या कायमच संसारात आनंदाची भर टाकतात. पतीच्या आयुष्यात कायम आनंद राहील
कन्या (Virgo) - जांभळा
या रंगाच्या बांगड्या संसरात सदैव उत्साहवर्धक ठरतात. पतीला त्यांच्या कामात तेजबळ निर्माण करतात
तुळ (Libra ) - निळा
निळ्या रंगाच्या बांगड्या घातल्याने पतीला दीर्घ आयुष्य लाभते.
वृश्चिक (Scorpio) - लाल
लाल रंगाच्या बांगड्या घातल्याने संसार सुखाचा होतो.
धनु (Sagittarius) - पिवळा
पिवळा रांग घातल्याने प्रेमसंबंधात गोडवा येतो.
मकर (Capricorn)- कोणत्याही दोन रंगाच्या बांगड्या घालाव्यात.
त्यामुळे रखडलेली आणि अडकलेली कामे लवकर मार्गी लागतात. कोणताही रंग चालेल पण त्यात दोन रंग अपेक्षीत आहे.
कुंभ (Aquarius)- गडद रंग
कुंभ राशीच्या लोकांनी कोणताही रंग निवडावा. पण कायम गडद रंगाच्या बांगड्या घालाव्यात. रंगाने कायम यश मिळेल.
मीन (Pisces ) - नारंगी आणि इतर कोणताही रंग
मीन राशीच्या लोकांनी नारंगी बांगडीबरोबर कोणत्याही रंगाची एक बांगडी अशा दोन बांगड्या घालाव्यात. कोणताही रंग चालेल.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हे ही वाचा :