Gold Rates Today : आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति किलो 3,000 रुपयांनी (gold rates) घसरण झालीय. रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine conflicts) तणावामुळे सोन्याच्या किमती अस्थिर झाल्या आहेत. भारतातील 22 कॅरेट सोन्याचा प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 46,700 रुपये आणि 24 कॅरेटसाठी 50,950 रुपये आहेत. गेल्या चार दिवसांपासून सोन्याचे दर घसरत आहेत.       



             22 कॅरेट      24 कॅरेट
मुंबई       46,700     50,950
पुणे         46,820      51,130
नागपूर    46,820     51,000
नाशिक   46,820     51,130
दिल्ली     46,700     50,950
कोलकत्ता 46,700     50,950
बॅंगलोर     46,700     50,950
चेन्नई        47,880     52,230


भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम


रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम आता थेट भारताच्या अर्थव्यवस्थेवर होताना दिसत आहे. आजचे सोन्याचे दर पाहता 22 कॅरेट 10 ग्रॅमसाठी, मुंबईत सोन्याचा भाव 46,700 रुपये, तर चेन्नईमध्ये सोन्याचा भाव 47,880 रुपये आहे. केरळमध्ये आज सोन्याचा दर 46,700 रुपये आहे.  दिल्लीत 22 कॅरेट सोन्यासाठी प्रति 10 ग्रॅम सोन्याचा दर 46,700 रुपये होता, तर चेन्नईमध्ये सोन्याचा दर 47,880 रुपये आहे. केरळमध्ये सोन्याचा दर 46,700 रुपये आहे


रशियावरील निर्बंधांमुळे जागतिक बाजारालाही धक्का 


युक्रेनवर हल्ला केल्याच्या निषेधार्थ अमेरिका आणि युरोपीय देश रशियावर सातत्याने नवनवीन निर्बंध लादत आहेत. त्यामुळे जागतिक बाजारपेठेतही सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. रशिया-युक्रेन संकटाशी संबंधित नवीन घडामोडींमुळे गेल्या काही दिवसांपासून भारतीय बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत वाढ झालेली दिसत होती. मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचा दर 1.5 टक्क्यांनी वाढून 50,990 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला होता. सोन्याच्या दरात जोरदार वाढ झालेली पाहायला मिळत होती. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा 


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्त्वाच्या बातम्या: