India Weather Update : सध्या उत्तर भारतातील वातावरणात चांगलाच बदल होत असल्याचे चित्र दिसत आहे. देशाच्या राजधानीसह उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये पावसामुळे तापमानात घट झाली होती. मात्र, आता हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 25 अंश तर किमान तापमान 12 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने सांगितला आहे. तसेच जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हलका पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात उन्हाचा चटका कायम आहे. तापामनात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाच्या झळा लागत आहेत. तर काही जिल्ह्यामध्ये तापमान पुन्हा घसरल्याचे पाहायला मिळाले. नाशिक, पुणे, सातारा, गडचिरोली या ठिकाणी तापमान घसरले आहे. तापमानात चढ उतार सरुच आहे


राजस्थान


राजस्थानच्या अनेक भागात पावसाने हजेरी लावल्यानं वातावरण थंड झाले होते. त्याचवेळी सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे राज्यात थंडीही जाणवत असल्याचे चित्र आहे. मात्र, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) माहितीनुसार, आता हवामान स्वच्छ होईल आणि सूर्यप्रकाश पडेल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आठवडाभर असेच वातावरण राहण्याची शक्यता आहे. आजच्या हवामानाबद्दल बोलायचे झाल्यास, जयपूर आणि उदयपूरमध्ये ढगाळ आकाश राहण्याची शक्यता आहे, तर चुरु आणि अजमेरमध्ये सूर्यप्रकाश राहील.


बिहार


आर्द्रता असलेल्या पश्चिमेकडील हवेमुळं राज्यात हवामानात बदल होताना दिसत आहे. मात्र, येथे हवामान सामान्य राहण्याचा अंदाज आहे. त्याचवेळी, राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान 28 अंश, तर किमान तापमान 14 अंशांवर राहू शकते.


पंजाब


गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसानंतर पंजाबमध्ये थंडी वाढली आहे. भारतीय हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, या संपूर्ण आठवड्यात राज्यात ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे. आज राज्यात पावसाची शक्यता आहे. तापमानाबाबत बोलायचे झाले तर बहुतांश जिल्ह्यांत कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 11 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.


जम्मू आणि काश्मीर


जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होत आहे. अधूनमधून पावसासोबत हिमवृष्टीही सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही अनेक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. आजच्या दिवसानंतर हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे. श्रीनगरमध्ये आज कमाल तापमान 5.5 अंश सेल्सिअस तर किमान तापमान उणे 3 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आज जम्मूमध्ये कमाल तापमान 25 आणि किमान तापमान 14 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.


उत्तराखंड


उत्तराखंडमधील बहुतांश जिल्ह्यांमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील, अनेक भागात पाऊस आणि हिमवृष्टी अपेक्षीत आहे. राज्यातील बहुतांश भागात आज किमान तापमान 2 अंश सेल्सिअस तर कमाल तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.


हिमाचल प्रदेश


आदल्या दिवशी झालेल्या हिमवृष्टी आणि पावसामुळे हिमाचल प्रदेशात किमान तापमानात घट झाली आहे. आजही वातावरण थंड राहील. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये 11 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान उणे 1 अंश राहण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: