Gold Rate Today : आंतरराष्ट्रीय तसेच भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर हे सतत अस्थिर होत असतात. ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिना हा सणवारांचा महिना असतो. या निमित्ताने ग्राहकांची बाजारात सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. तुम्हालाही सोनं खरेदी करायचं असेल तर लवकर करून घ्या. कारण सोन्याच्या दरात किंचित वाढ झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.50 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,220 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 59,150 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,868 59,150
पुणे 47,868 59,150
नाशिक  47,868 59,150
नागपूर 47,868 59,150
दिल्ली 47,786 59,050
कोलकाता  47,804 59,070

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :