Google Search Engine Down : नेटकऱ्यांचं लोकप्रिय सर्च इंजिन असलेलं Google डाऊन झालं आणि काही काळासाठी अनेकांचं काम ठप्प झालं. मंगळवारी म्हणजेच, 9 ऑगस्टच्या सकाळी जवळपास 7 वाजता जगभरात सर्च इंजिन गूगल (Google) तब्बल 10 मिनिटांसाठी डाऊन झालं होतं. दरम्यान, कंपनीकडून तात्काळ याप्रकाराची दखल घेण्यात आली. त्यानंतर काही काळातच गुगलच्या सेवा पुन्हा पूर्ववत करण्यात आल्या. त्याच वेळी, सेवा अचानक बंद झाल्यामुळे, जागतिक स्तरावर अनेक वापरकर्त्यांना समस्यांना सामोरं जावं लागलं. मात्र, गूगल डाऊन होण्याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. 


गूगल डाऊन झालं त्यावेळी अनेक युजर्सना सर्च करताना समस्यांचा सामना करावा लागत होता. त्यावेळी युजर्सना स्क्रिनवर 500 That’s an error मेसेज दिसत होता. गूगल युजर्स वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर सर्च करताना येणाऱ्या एररचे स्क्रिनशॉर्ट्स शेअर करत आहेत. 


नेटकऱ्यांकडून Twitter वर पाऊस 


गूगल डाऊन होताच नेटकऱ्यांची ट्विटरवर वेगवेगळ्या पोस्ट आणि मीम्स पोस्ट करण्यास सुरुवात झाली. अनेकांनी मीम्स शेअर करत गुगलची फिरकीही घेतली. काही युजर्सनी ट्विटरवर गूगल सर्च इंजिनचे स्क्रिन शॉर्ट्स शेअर करण्यास सुरुवात केली. रेयान बेकर नावाच्या एका युजरनं म्हटलं की, "पहिल्यांदा गूगल सर्च इंजिन डाऊन होताना पाहिलं आहे. असं कधीच पाहिलं नव्हतं." 






एका युजरनं फिरकी घेत विचारलं की, "तुमचंही गूगल डाऊन आहे की, हे फक्त माझ्यासोबतच होत आहे?"






Bowjiden नावाच्या एका युजरनं म्हटलं की, मी कधी स्वप्नातही विचार करु शकत नाही की, माझ्या आयुष्यात मी गूगल डाऊन झालेलं पाहिलंय. जर हे होऊ शकतं, तर उद्या काहीही होऊ शकतं."






एका युजर्सनं म्हटलं की, "आम्ही गूगल करु शकत नाही, गूगल का डाऊन झालंय? हा या जगाचा अंत तर नाही?". तर पुढे एका युजरनं म्हटलंय की, "आता Yahoo चे CEO खूप होतील, कारण त्यांच्या साईटवर ट्रॅफिक येत असेल. चला आज कोणाच्यातरी आयुष्यात आनंद आला."