Shani Margi 2023: रावाचा रंक आणि रंकाचा राव करणारा ग्रह म्हणजे शनि ग्रह (Shani). शनि हा शिस्तीचा आणि न्यायाचा देव मानला जातो. अशा शनीची राशी 2023 मध्ये कुंभ राशीत बदलली आहे. शनि 2024 मध्येही वर्षभर कुंभ राशीत राहणार आहे. जर काही लोक असा विचार करत असतील की, 2024 मध्ये शनिचा राशी बदल होईल, शनि दुसऱ्या राशीत प्रवेश करेल. तर तसं होणार नाही. शनि आता थेट मार्च 2025 मध्ये आपली राशी बदलेल. 2025 मध्ये शनि मीन राशीत प्रवेश करेल. शनीचा हा बदल अनेक राशींसाठी चांगले आणि वाईट परिणाम घेऊन येईल.
शनीला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे अडीच वर्षं लागतात. अशाप्रकारे शनीला एक राशी चक्र पूर्ण करण्यासाठी सुमारे 30 वर्षांचा कालावधी लागतो.
या 3 राशींची साडेसाती सुरू
सध्या मकर, कुंभ आणि मीन राशीवर शनीची साडेसाती सुरू आहे. या राशींना 2025 मध्ये शनि साडेसातीपासून खूप आराम मिळू शकतो. मकर राशी सध्या साडेसातीच्या शेवटच्या टप्प्यात आहे. कुंभ राशीच्या साडेसातीचा मधला टप्पा आहे. मीन राशीसाठी साडेसातीचा हा पहिला टप्पा आहे. मीन राशीवरील साडेसातीचा पहिला टप्पा 7 एप्रिल 2030 रोजी संपणार आहे. मार्च 2025 पूर्वी शनीची साडेसाती असणाऱ्या राशींच्या लोकांसाठी शनि कोणते बदल घेऊन येणार आहे, हे जाणून घेऊया.
मकर रास (Capricorn)
साडेसाती मकर राशीसाठी चांगले आणि वाईट दोन्ही परिणाम घेऊन येत आहे. मकर राशीच्या लोकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील, परंतु त्यांना मिळणार आर्थिक लाभ देखील कमी होईल. एकीकडे कर्जाची परतफेड होईल, पण दुसरीकडे घरखर्च वाढेल. मालमत्तेचा वादही निर्माण होऊ शकतो.
कुंभ रास (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांना नोकरीत लाभ मिळेल. रखडलेली कामं पूर्ण होतील आणि भविष्यात तुम्हाला त्याचा चांगला फायदा देखील होईल. कुंभ राशीच्या लोकांना आरोग्याबाबत सतर्क राहावं लागणार आहे. तुमच्या जोडीदाराचीही काळजी घ्या.
मीन रास (Pisces)
मीन राशीच्या लोकांना कठोर परिश्रम करावे लागणार आहेत. तुमच्यासाठी व्यवसायाच्या अनेक नवीन शाखा उघडत आहेत. मात्र व्यवहार आणि गुंतवणुकीत सावध राहा, कारण नुकसान होण्याची देखील दाट शक्यता आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा: