Gold Silver Rate Today : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या-चांदीच्या (Gold) किमती घसरल्याचा (Silver) परिणाम आज भारतीय किरकोळ सराफा बाजारावर दिसून येत आहे. काल जागतिक बाजारात सोन्याच्या भावात 0.9 टक्क्यांनी घट झाली होती, तर आज सोने 1.22 टक्क्यांनी घसरले आहे. आज भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदी या दोन्ही दरात घसरण दिसून येत आहे. किरकोळ बाजारात सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला आहे.
देशाच्या किरकोळ बाजारात सोन्या-चांदीचे भाव
देशातील किरकोळ बाजारात 22 कॅरेट सोन्याचा भाव आज प्रति 10 ग्रॅम 500 रुपयांनी स्वस्त झाला असून 24 कॅरेटचे सोने प्रति 10 ग्रॅम 550 रुपयांनी स्वस्त झाले आहे. दिल्लीत 22 कॅरेट शुद्धतेसाठी सोन्याचा भाव 500 रुपयांनी घसरला असून तो 46550 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 550 रुपयांनी घसरून 50,770 रुपयांवर खाली आला आहे.
फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्या-चांदीच्या किंमती
फ्युचर्स मार्केटमध्ये, MCX वर सोने 236 रुपयांनी किंवा 0.47 टक्क्यांनी घसरून 50,045 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. या किमती ऑक्टोबरच्या फ्युचर्ससाठी आहेत. याशिवाय चांदीच्या किमतीवर नजर टाकली तर ती 361 रुपयांच्या घसरणीसह व्यवहार करत आहे. त्याचा डिसेंबर फ्युचर्स 0.68 टक्क्यांनी घसरून 52,785 रुपये प्रति किलोवर दिसत आहे.
जागतिक बाजारपेठेतील सोन्या-चांदीचे दर जाणून घ्या
जागतिक बाजारात सोन्याचा दर 1.22 टक्क्यांनी घसरून 1693.05 डॉलर प्रति औंस झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदी 1.94 टक्क्यांच्या घसरणीसह 17.86 डॉलर प्रति औंसवर व्यवहार करत आहे.
मुंबईत सोन्याचा भाव
22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 46400 रुपये ( 500 रुपयांची घसरण)
24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 50620 रुपये (540 रुपयांची घसरण)
चेन्नईत सोन्याचा दर
22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 47150 रुपये ( 350 रुपयांची घसरण)
24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 51430 रुपये ( 390 रुपयांची घसरण)
कोलकातामध्ये सोन्याचा दर
22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 46400 रुपये ( 500 रुपयांची घसरण)
24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 50620 रुपये ( 540 रुपयांची घसरण)
जयपूरमध्ये सोन्याचा दर
22 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 46550 रुपये ( 500 रुपयांची घसरण)
24 कॅरेटसाठी प्रति 10 ग्रॅम 50770 रुपये ( 550 रुपयांची घसरण)
घरी बसूनही सोन्याचे भाव तपासा
सोन्याचे भाव माहिती करून घ्यायचे असल्यास तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल.
इतर महत्वाच्या बातम्या
Petrol-Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा मोठी घट; देशांतर्गत पेट्रोल-डिझेलच्या किमती मात्र स्थिर, कपात होणार?
Pradhanmantri Gyaanveer Yojana : 'या' सरकारी योजनेत तरुणांना दरमाह मिळणार 3400 रुपये? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती