Nanded Farmers : नांदेड जिल्ह्यात पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची सध्या  धडपड सुरू आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीने  सोयाबीन, उडीद, मूग, कापूस, केळी या पिकांचे मोठं नुकसान झालं होतं. जिल्ह्यातील 8 लाख हेक्टरवरील पिकांचे 80 टक्के नुकसान झाले आहे. तर आता गेल्या 25 दिवसापासून नांदेड जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यानं उर्वरित 20 टक्के पिकेही वाळून जात असल्यानं, शेतकऱ्यांचे यावर्षी 100 टक्के नुकसान झालं आहे.


नांदडे जिल्ह्यात 4 लाख 50 हजार हेक्टर एवढा सोयाबीन पिकाचा पेरा झाला आहे. त्यातील 3 लाख 50 हजार हेक्टर वरील सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. दरम्यान उन्हामुळं वाळून जाणारी पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड चालू आहे. ज्यासाठी शेतकरी टॅंकरने, तुषारने पाणी देत आहेत. ही पिके वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पावसाळ्याच्या सुरुवातीला झालेल्या बेफाम अतिवृष्टीनं 80 टक्के पिके वाय गेली आहेत. तर आता गेल्या 25 दिवसात पावसाने उघडीप घेतल्याने उर्वरित 20 टक्के पिकेही वाळली आहेत. दरम्यान, उन्हामुळं वाळून जाणारी पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरु आहे. टॅंकरने, तुषारने पाणी देत ही पिके वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत.




नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसह बाधित क्षेत्रात भर पडून एकूण सात लाख 41 हजार शेतकऱ्यांचे पाच लाख 27 हजार हेक्टर मधील खरीपासह बागायती आणि फळ पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा सुधारित अहवाल शासनाकडे पाठवला आहे. यात बाधितांना  एनडीआरएफच्या नव्या निकषनुसार (दुप्पट भरपाई ) भरपाईसाठी जिल्हा प्रशासनाने 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयाची मागणी शासनाकडे केली आहे.
     
भरपाईसाठी जिल्हा प्रशासनातर्फे  717 कोटी 88 लाखांची मागणी 


नांदेड जिल्ह्यात यंदा जुलै ऑगस्ट महिन्यात अतिवृष्टी होऊन अनेक मंडळात एकापेक्षा अधिक वेळात अतिवृष्टीची नोंद झाली होती. जुलैमध्ये तर एका महिन्यात विक्रमी 606 मिलिमीटर पाऊस होऊन पिकांची दाणादाण उडाली होती. अतिवृष्टीमुळं नदी नाल्यांना पूर येऊन नदीकाठची जमीन खरडून गेली सखल भागातील पिके पाण्याखाली गेली होती. जिल्ह्यात झालेल्या प्रचंड नैसर्गिक आपत्तीत जिरायती  मधील सोयाबीन, कपाशी, ज्वारी, तुर, उडीद, मूग या पाच लाख 27 हजार 141 हेक्टरवरील पिकांस सह 314 हेक्टरवरील  बागायती व 66 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. यात सात लाख 41 हजार 946 शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्वच सोळा तालुक्याकडून नुकसानीची अंतिम आकडेवारी घेतली. यासाठी  एनडीआरएफच्या नव्या निकषानुसार (दुप्पट भरपाई) जिल्ह्यासाठी 717 कोटी 88 लाख 91 हजार 600 रुपयांची मागणी जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून राज्य शासनाकडे केली आहे. 


सोयाबीन उत्पादनावर परिणाम होणार 


दरम्यान, नांदेड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळं एकूण 8 लाख हेक्टर लागवड क्षेत्रांपैकी, पाच लाख हेक्टरावरील पिके बाधित झाली आहेत. तर एकट्या सोयाबीन लागवड क्षेत्राचे 3 लाख 50 हजार हेक्टरवरील नुकसान झाले आहे. दरवर्षी जिल्ह्यातून जवळपास 32 लाख क्विंटल सोयाबीनचे उत्पादन होते. त्यामुळं या नुकसानीचा फटका मोठ्या प्रमाणात सोयाबीन उत्पादनावर होणार आहे.


नांदेड जिल्ह्यात एकूण लागवड क्षेत्र 8 लाख हेक्टर


बाधित क्षेत्र 5 लाख हेक्टर


सोयाबीन क्षेत्र 4 लाख 50 हजार हेक्टर


सोयाबीन नुकसान 3 लाख 50 हजार


गेल्या वर्षी सोयाबीन उत्पादन 4 लाख हेक्टर 


महत्त्वाच्या बातम्या: