Central Govt Schemes : लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत अनेक कल्याणकारी योजना सरकार राबवल्या जातात. यातील अनेक योजनांची अनेकांना माहितीही नसते. यामुळेच अनेक वेळा लोक फसवणुकीला बळी पडतात. अनेक योजनांमध्ये उद्योजकांसाठी सबसिडी आणि भत्तेही योजले जातात. आता मोदी सरकारच्या (Modi Government) 'प्रधानमंत्री ज्ञानवीर योजने' (Pradhanmantri Gyaanveer Yojana News) अंतर्गत तरुणांना दरमहा 3400 रुपये मिळणार असल्याचं बोलले जात आहे.  


दरमहा 3400 रुपये मिळणार


सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होत असलेल्या एका मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, 'प्रधानमंत्री ज्ञानवीर योजने'मध्ये (Pradhanmantri Gyaanveer Yojana) नोंदणी केल्यास तरुणांना दरमहा 3400 रुपये दिले जातील. अशा कोणत्याही योजनेत नोंदणी करण्यापूर्वी त्याची खात्री करून घ्यावी.  जाणून घेऊया प्रधानमंत्री ज्ञानवीर योजना नक्की आहे तरी काय?  






व्हायरल होणारा मेसेज काय? 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमध्ये असा दावा केला जात आहे की, या तरुणांना सरकारकडून दरमहा 3,400 रुपयांची मदत दिली जाईल. यासाठी प्रधानमंत्री ज्ञानवीर योजनेत (Pradhanmantri Gyaanveer Yojana) नोंदणी करणं आवश्यक आहे. मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीनं या योजनेअंतर्गत 3400 रुपये मिळाल्याचा दावाही केला आहे.


फॅक्ट चेक 


सरकारी एजन्सी प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) नं व्हायरल मेसेजची वस्तुस्थिती तपासली (PIB FactCheck) आणि त्यामध्ये निदर्शनास आलं की, व्हायरल होणारा मेसेज पूर्णपणे खोटा आहे.  पूर्णपणे बनावट आहे. अशा कोणत्याही संदेशाच्या नावाखाली तुमची माहिती शेअर करू नका, असं आवाहनही पीआयबीकडून जारी करण्यात आला आहे. 


लोकांची फसवणूक करण्यासाठी अशा बनावट योजनांची नावे सरकारी योजनांसारखीच नावं ठेवली जातात, असंही पीआयबीच्या वतीनं सांगण्यात आलं. अशी नावं पाहून लोक अनेकदा फंदात पडतात. हे लोक सरकारी नोकऱ्यांच्या नावानं बनावट लिंक शेअर करतात, त्या लिंकवर क्लिक केल्यावर तुमच्या बँक अकाउंटमधील पैशांवर डल्ला मारला जाऊ शकतो. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Money Laundering Case : एनएसईचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी रवी नारायण यांना ईडीकडून अटक