Gold Rate Today : ऑगस्ट महिन्याला सुरुवात झाली आहे. ऑगस्ट महिना हा सणवारांचा महिना असतो. या निमित्ताने ग्राहकांची बाजारात सोने-चांदी (Gold-Silver Rate) खरेदी करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते. मागच्या आठवड्यात काहीसे कमी झालेले सोन्याचे दर या आठवड्यात पुन्हा वाढायला सुरुवात झाली आहे. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स 0.34 टक्क्यांनी वाढून 24 कॅरेट सोन्याचा दर 52,070 रूपयांवर आला आहे. तर, 1 किलो चांदीचा दर 58,200 रूपयांवर व्यवहार करत आहे. तुमच्या शहरातील आजचे सोन्या-चांदीचे जर नेमके काय आहेत ते जाणून घ्या. 

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे आजचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  47,731 58,200
पुणे 47,731 58,200
नाशिक  47,731 58,200
नागपूर 47,731 58,200
दिल्ली 47,648 58,100
कोलकाता  47,667 58,130

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या :