दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. कर्ज पुन्हा महागण्याची शक्यता, आरबीआय आज पतधोरण जाहीर करणार, कर्जावरचे व्याज दर वाढवण्याचे संकेत
RBI rbi monetary policy : कर्जदारांची आज पुन्हा निराशा होण्याची शक्यता आहे.. कारण रिझर्व्ह बँकेकडून (RBI) कर्जावरचे व्याजदर पुन्हा वाढवले जाण्याचे संकेत मिळत आहेत. आज आरबीआयचं पतधोरण जाहीर होणार आहे. आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. त्यामुळे सकाळी १० वाजता आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (shaktikant Das) पतधोरण जाहीर करतील. रेपो दरात 35 ते 50 बेसिस पॉइंट्सची वाढ जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळं गृहकर्जासह सर्व प्रकारची कर्ज महाग होऊ शकतात. आरबीआयकडून 0.50 टक्के व्याजदर वाढवण्याचा अंदाज आहे. पतधोरण जाहीर करताना महागाईवर नियंत्रण मिळवण्याच्या आव्हानासोबतच भारताला मंदीच्या छायेत न जाऊ देण्याचं देखील आव्हान असणार आहे.भारतीय रिझर्व्ह बँकेची द्विमासिक पतधोरण आढावा बैठक 3 ऑगस्ट पासून सुरू झाली आहे. रिझर्व्ह बँकेच्या (RBI MPC meeting) बैठकीचा आज शेवटचा दिवस आहे. रिझर्व्ह बँकेकडून आज नवीन पतधोरण जाहीर केले जाणार आहे. रिझर्व्ह बँकेचे गर्व्हनर शक्तिकांत दास पत्रकार परिषद घेऊन बैठकीतील नवीन निर्णयाची माहिती देतील.
2. दीड वर्षांत 10 लाख सरकारी पदं भरणार, रेल्वे, पोस्ट, संरक्षणसह इतर महत्त्वाच्या खात्यातील पदांचा समावेश, मंत्री जितेंद्र सिंह यांची राज्यसभेत माहिती
3. खाद्यतेलाचे दर प्रतिलिटर 10 ते 15 रुपयांनी कमी होणार, आंतरराष्ट्रीय बाजारात दर घसरल्यानं दरकपातीबाबत केंद्राकडून तेलकंपन्यांना विचारणा
4. मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर वाढला, शेतशिवार आणि घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान, अनेक ठिकाणी जनावरं वाहून गेल्याच्या घटना
5. मंत्रिमंडळ विस्ताराचा आजचा मुहूर्त हुकण्याची शक्यता, फडणवीसांच्या दिल्लीवारीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष, काही नेत्यांच्या मंत्रिपदावरुन दोन्ही गटात नाराजीची चर्चा
6. महाविकास आघाडी सरकारचे काही निर्णय धडाधड रद्द का केले? शिंदे-फडणवीस सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश
7. पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अटकेनंतर आज पत्नी वर्षा यांची ईडी चौकशी, सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याबाबत समन्स
8. महाविकास आघाडीला पुन्हा धक्का; मुंबई बँकेच्या अध्यक्षपदासाठी प्रविण दरेकर यांचा मार्ग मोकळा
9. आरेमधल्या कारशेडविरोधातील सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ प्रशांत भूषण पर्यावरणवाद्यांची बाजू मांडणार
10.ईडी कारवाई, बेरोजगारी, महागाईविरोधात काँग्रेसकडून देशभर आंदोलनाचा इशारा, राहुल गांधी-प्रियंका गांधी रस्त्यावर उतरणार, महाराष्ट्रात राजभवनावर मोर्चा काढणार