Gold rate today : भारतीय बाजारपेठेत गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे तसेच चांदीचे दर काहीसे घटताना दिसत आहे. मागच्या आठवड्यापासून सोन्याच्या दरात सातत्याने घट सुरुच आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.07 टक्क्यांनी म्हणजेच 35 रुपयांनी घसरून आज 24 कॅरेट सोन्याचे दर 51,498 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​व्यवहार करत आहेत. 

काय आहेत आजचे दर ?

आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्याचे फ्युचर्स 0.07 टक्क्यांनी म्हणजेच 35 रुपयांनी घसरून 24 कॅरेट सोने 51,498 वर व्यवहार करत आहेत. तर, 22 कॅरेट सोन्याचा दर 47,800 रूपये झाला आहे. चांदीच्या दरातही किंचित घट झाली असून आज 1 किलो चांदी 66,454 वर व्यवहार करत आहे. 

शहर दर 
मुंबई 47,800
पुणे 47,770
नाशिक  47,850
नागपूर 48,850
दिल्ली 47,800
कोलकाता 47,800
चेन्नई 48,030

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

  •