PNB New Rules: पंजाब नॅशनल बँकेत खाते असलेल्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. जर तुमचेही या बँकेत खाते असेल तर आजपासून नियमात मोठा बदल करण्यात आला आहे. पीएनबीने ट्वीट करून या बदलाची माहिती आधीच ग्राहकांना दिली होती. या बदलाचा मोठा परिणाम चेक पेमेंट करणाऱ्या ग्राहकांवर होणार आहे.


पॉझिटिव्ह पे सिस्टिम लागू 


पंजाब नॅशनल बँकेने सांगितले आहे की, 4 एप्रिल 2022 पासून म्हणजेच आजपासून बँकेत पॉझिटिव्ह पे सिस्टिम अनिवार्य झाली आहे. जर कोणत्याही ग्राहकाने बँकेच्या शाखेतून किंवा डिजिटल चॅनलद्वारे 10 लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे धनादेश जारी केले, तर त्यांच्यासाठी PPS पुष्टीकरण आवश्यक असेल.


काय आहे पॉझिटिव्ह पे सिस्टिम? 


ग्राहकांना याबाबतची माहिती देत बँकेने आपल्या अधिकृत वेबसाइटवर माहिती शेअर केली आहे. बँकेच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातमीनुसार, आता 4 एप्रिल 2022 पासून, बँकेने चेक पेमेंट करण्यासाठी पॉझिटिव्ह पे सिस्टिम अनिवार्य करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे 10 लाखांचा धनादेश दिल्यानंतर आता डिजिटल किंवा शाखा पडताळणी करणे आवश्यक झाले आहे.


टोल फ्री क्रमांकावर करा कॉल 


बँकेच्या या सुविधेबद्दल तपशीलवार माहिती घेण्यासाठी तुम्ही 1800-180-2222 किंवा 1800-103-2222 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करू शकता.


बँकिंग फसवणूक टाळण्यासाठी होईल मदत


देशभरात वेगाने वाढणारी बँकिंग फसवणूक थांबवण्यासाठी बँकेने ही सुविधा सुरू केली आहे. पॉझिटिव्ह पे सिस्टिम फसवणुकीला आळा घालण्यास मदत करेल. फसवणूक झालेल्या धनादेशाची माहिती पडताळणीसाठी बँक आणि ग्राहकांकडे येईल.


महत्वाच्या बातम्या