E-shram Card Benefits: जर तुम्ही अद्यापही ई-श्रम पोर्टलवर नोंदणी केली नसेल, तर लवकरच करून घ्या. या योजनेसाठी नोंदणी करणाऱ्यांची संख्या 27 कोटींच्या पुढे गेली आहे. यावर असंघटित क्षेत्रातील कामगारांनी नोंदणी केली आहे. आतापर्यंत या योजनेअंतर्गत ई-श्रम पोर्टलवर 27 कोटी 09 लाख 39 हजार 540 लोकांनी नोंदणी केली असून या लोकांना ई-श्रमिक कार्ड जारी करण्यात आले आहेत.


यूपी सरकार दरमहा देत आहे 1000 रुपये 


केंद्र सरकारने देशातील मजुरांसाठी ही योजना सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने या योजनेअंतर्गत गरीब मजुरांना दरमहा 1000 रुपये भत्ताही दिला आहे. याशिवाय सरकार कामगारांना 2 लाख रुपयांचा अपघात विमाही देत ​​आहे. जर तुम्ही अद्याप या योजनेत नोंदणी केली नसेल, तर लगेच करा, खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही नोंदणी करू शकता -


ई-श्रम कार्ड नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे



  • आधार कार्ड

  • पॅन कार्ड

  • पासपोर्ट आकाराचा फोटो

  • मोबाईल नंबर

  • बँक खाते तपशिल


अशी करा नोंदणी


या योजनेअंतर्गत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या फोनमधील ई-श्रम मोबाईल अॅप्लिकेशनवर जावे लागेल किंवा तुम्ही अधिकृत वेबसाइटलाही भेट देऊ शकता. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या कॉमन सर्व्हिस सेंटर, स्टेट सर्व्हिस सेंटर किंवा डिजिटल सेवा केंद्राशी संपर्क साधू शकता.


महत्वाच्या बातम्या