Gold Silver Price Today : गुढीपाडव्याचा सण अवघ्या काही दिवसांवरच आहे. अशा वेळी सोने-चांदी (Gold-silver rate) खरेदीसाठी ग्राहकांची लगबग सुरु झाली आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे (Russia-Ukraine War) सोन्या-चांदीच्या दरात काहीशी अस्थिरता असताना आजचे सोन्या-चांदीचे दर नेमके कय आहेत ते जाणून घ्या. 

काय आहेत सोन्या चांदीचे ताजे दर ?

गुड रिटर्न्सच्या वेबसाईनुसार आज 22 कॅरेट सोन्याचा दर 47,750 रूपये झाला आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर काहीशा प्रमाणात वाढला आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 52,090 रूपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 10 ग्रॅम चांदीचा दर 721 रूपये झाला आहे. 

आज 30 मार्च जाणून घ्या तुमच्या शहरातील दर : 

 शहर दर
मुंबई 47,750
पुणे 47,810
नाशिक 47,650
नागपूर 47,810
दिल्ली 47,450
कोलकाता 47,560

जागतिक बाजारात घसरलेले दर :

जागतिक बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.14 टक्क्यांनी घसरून $1,925.60 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट रेट 0.46 टक्क्यांनी घसरून $25.08 प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील घसरणीमुळे भारतातील सोन्याच्या दरात किंचित घसरण झाली आहे. 

तुमच्या शहराचे दर तपासा :

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता. 

महत्वाच्या बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha