Petrol-Diesel Price : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत आहे. बुधवारीही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होणार आहे. बुधवारी राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये 80 पैशांनी वाढ होणार आहे. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये बुधवारी पेट्रोल 101.1 रुपये प्रति लीटर तर डिझेल 92.27 प्रतिलीटर मिळणार आहे. मागील 9 दिवसातील ही आठवी दरवाढ आहे. दररोज वाढणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशालाचा चाप बसत आहे. महगाई गगणाला भिडली आहे, त्यातच इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. जागतिक बाजारपेठात कच्च्या तेलाच्या भावात मोठी घसरण झाली आहे.  कच्च्या तेलाचे भाव 108 डाॅलर प्रति बॅरलवर पोहचले आहेत. तरीही भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ होत आहे.


22 मार्चपासून देशात पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा भडका उडाला आहे. नऊ दिवसात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये 5.60 रुपये प्रति लीटर वाढ झाली आहे. 22 मार्चआधी देशात तब्बल 137 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. चार नोव्हेंबर 2021 ते 21 मार्च 2022 पर्यंत देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.


मेट्रो शहरातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती -  


राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल प्रतिलीटर 101.01 रुपये तर डिझेल प्रति लीटर 92.27 रुपये होणार आहे.


मुंबईमध्ये पेट्रोलची किंमत 115.84 रुपये तर डिझेलची किंमत 100.05 रुपये प्रतिलीटर झाली आहे.


चेन्नईमध्ये पेट्रोल 106.74 तर डिझेल 96.82 रुपये प्रतिलीटर झाली आहे.


कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लीटर 110.48 आणि डिझेलची किंमत 95.42 रुपये इतकी झाली आहे.


इंधन दरवाढीवर केंद्र सरकारचं स्पष्टीकरण –
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे. यावरुन विरोधीपक्षाने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले. वाढत्या इंधनाच्या दरावर केंद्र सरकारने स्पष्टीकरण दिले आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंगळवारी राज्यसभेत इंधन दरवाढीवर मौन सोडलं. इंधनाच्या वाढत्या किंमती आपल्यासाठी एक मोठं आव्हान आहे.  अर्थ विधेयकावर चर्चा करताना सीतारमण यांनी म्हणाल्या की, 2010-11 पासून  2021-22 पर्यंत पेट्रोल आणि डिझेलवरील सेस साठी केंद्र सरकारने 11.37 लाख कोटी रुपये खर्च केलेत. 


पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?


इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).