Summer Tips : वाढत्या उष्णतेमुळे सर्वांचेच बाहेर पडणे आणि काम करणे कठीण झाले आहे. घरातून बाहेर पडताच कडक उन्हामुळे घाम फुटतो. या रणरणत्या उन्हामुळे आपण आजारी देखील पडू शकता. मात्र, काही गोष्टी लक्षात ठेवून, स्वतःची काळजी घेऊन, तुम्ही उन्हाच्या तडाख्यापासून दूर राहू शकता. उन्हाळ्यात स्वतःचे संरक्षण कसे करावे, यासाठी काही खास टिप्स...
कडक सूर्यप्रकाशापासून तोंड आणि डोके सुरक्षित ठेवा!
घराबाहेर पडताना तोंड आणि डोके कडक सूर्यप्रकाशापासून संरक्षित केले पाहिजे. कारण, जेव्हा हा तप्त सूर्य प्रकाश तुमच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर पडतो, तेव्हा तुम्हाला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यामुळे तुमचा चेहरा काळा होऊ शकतो आणि टॅनिंग होऊ शकते. दुसरीकडे सूर्यप्रकाश डोक्यावर पडल्याने डिहायड्रेशनची समस्याही होऊ शकते.
भरपूर पाणी प्या
याशिवाय उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पाण्याची कमतरता भासू नये, म्हणून वेळोवेळी पाणी पीत रहा. उन्हाळ्यात लोक भरपूर पाणी पितात, परंतु तरीही त्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
सुती आणि आरामदायक कपडे घाला
उन्हाळ्यात नेहमी सुती आणि आरामदायी कपडे घालावेत. कारण, इतर कापडांमुळे तुम्हाला खूप लवकर उष्णता जाणवायला लागेल आणि तुम्ही दिवसभर अस्वस्थ राहाल.
उन्हात बाहेर जाण्यापूर्वी सनस्क्रीन लावा
रखरखत्या उन्हात जेव्हा घराबाहेर पडाल, तेव्हा सनस्क्रीन लोशन लावा. यामुळे तुमची त्वचा कडक सूर्यप्रकाशापासून सुरक्षित राहील. तसेच, तुमची त्वचा काळी पडणार नाही आणि टॅनिंगही होणार नाही.
फळांचा रस पीत राहा
अधिकाधिक फळांचा रस अधिक प्या. फळांचा ज्यूस प्यायल्याने अनेक पोषक तत्वे मिळतात. यामुळे शरीराला ताजेतवाने वाटते. उन्हाळ्यात फळांचा रस प्यायला तर शरीराला जास्त फायदा होतो, कारण काही फळे थंड असतात, ज्यामुळे तुमचे शरीर देखील थंड राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.