Share Market Updates : चार दिवसाच्या सुट्टीनंतर सुरू झालेल्या शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 1000 अंकांनी कोसळला आहे. तर, निफ्टीमध्ये 300 अंकाची घसरण झाली आहे. जागतिक शेअर बाजारात झालेल्या पडझडीचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला. रशिया-युक्रेन दरम्यान सुरू असलेले युद्ध, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढलेल्या दराचा परिणाम शेअर बाजारावर झाला असल्याचे म्हटले जात आहे. 



सिंगापूर एक्सचेंजवरील (SGX निफ्टी) निफ्टी फ्युचर्स वरील व्यवहाराने देशांतर्गत शेअर बाजाराची सुरुवात 'गॅप डाऊन'ने होण्याचे संकेत दिसत होते. सेन्सेक्स 57,310 अंकावर आणि निफ्टी 17,183 अंकावर खुला झाला. निफ्टीमधील 50 पैकी 7 शेअरमध्ये तेजी दिसत आहे. तर, 43 शेअरर्समध्ये घसरण दिसून आली आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 4 शेअर्समध्ये तेजी दिसत असून 26 शेअरमध्ये घसरण दिसत आहे. बँक निफ्टीमध्ये 1.73 टक्क्यांची घसरण दिसत असून 36,813 अंकावर व्यवहार करत आहे. 


 





एफएमसीजी, मेटल्स क्षेत्र वगळता इतर क्षेत्रात घसरण दिसून येत आहे. स्मॉल कॅप आणि मिडकॅप शेअर्समध्ये बँकिंग, ऑटो, आयटी, फार्मा सारख्या घसरण दिसून आली आहे.


एनटीपीसीमध्ये 1.59 टक्के, टाटा स्टीलमध्ये 0.87 टक्के, महिंद्रा अॅण्ड महिंद्रा 0.49 टक्के, पॉवरग्रीडमध्ये 0.17 टक्के, एचयूएलमध्ये 0.12 टक्के, नेस्लेमध्ये 0.05 टक्के. आयटीसीमध्ये 0.04 टक्क्यांची तेजी दिसत आहे. 


इन्फोसिसमध्ये 5.87 टक्के, टेक महिंद्रामध्ये 3.92 टक्के, कोटक महिंद्रामध्ये 2.88 टक्के, एचडीएफसी 2.66 टक्के, एचडीएफसी बँक 2.38 टक्के, विप्रो 2.17 टक्के, आयसीआयसीआय बँक 1.23 टक्के, अॅक्सिस बँक 1.67 टक्के घसरण नोंदवण्यात आली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या: