Gold Rate Today : भारतात लग्नसराईच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) वाढ झाली. अर्थात, हे दर स्थिर नसले तर याचा परिणाम सामान्य ग्राहकांवर होतो. गेल्या 24 तासांत पाहता सोन्याच्या दरात किंचित फरकाने वाढ झाली आहे. तर, चांदीचे दर कमी झाले आहेत. आज बुलियन्सच्या वेबसाईटनुसार पाहिल्यास, सोन्याचे फ्युचर्स दर 0.30 टक्क्यांनी वाढ होऊन 24 कॅरेट सोन्याचा दर 53,090 रूपयांवर आला आहे. तर, एक किलो चांदीचा दर 62,100 रुपये आहे.  

तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचे दर : 

शहर सोने 1 किलो चांदीचा दर 
मुंबई  48,666 62,100
पुणे 48,657 62,160
नाशिक  48,657 62,160
नागपूर 48,657 62,160
दिल्ली 48,583 62,100
कोलकाता  48,611 62,120

जागतिक बाजारातील दर : 

स्पॉट सोने 0059 GMT नुसार प्रति औंस $1,633.69 वर लिस्टलेस होते, यापूर्वी 21 ऑक्टोबरपासून सर्वात कमी पातळी गाठली होती. यूएस सोन्याचे फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी घसरून $1,636.30 वर आले. स्पॉट सिल्व्हर 0.2% वाढून $19.18 प्रति औंस, प्लॅटिनम 0.1% घसरून $924.51 वर आणि पॅलेडियम 0.9% वाढून $1,856.91 वर आले.

खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा (Check Gold Purity) :

तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.

तुमच्या शहराचे दर तपासा (Check Gold Rate In Your City) : 

तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अॅंड ज्वेलर्स असोसिए शनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 

महत्वाच्या बातम्या : 

Share Market Updates: सुरुवातीच्या घसरणीनंतर शेअर बाजार सावरला, अस्थिरतेचे संकेत