Gold Rate News : दिवसेंदिवस सोन्या चांदीच्या दरात (Gold Silver Rate) वाढ होत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला चांगलीच झळ बसत आहे. गेल्या चार दिवसात जळगावमध्ये (Jalgaon) सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये (budget) सोन्याच्या करात सवलत दिल्याचा परिणाम म्हणून सोन्याच्या दरात 5 हजार रुपयांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता पुन्हा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. 


सध्या सोन्याचे दर किती?


पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. गेल्या चारच दिवसात सोन्याच्या दरात 2 हजार रुपयांची वाढ झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर अमेरिकन फेडरल बँकांनी आपल्या व्याजदरात कपात केल्याचा परिणाम म्हणून गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक सोन्याच्यामध्ये करण्यास सुरुवात केली आहे. मागणी वाढूनही सोन्याचे दर हे चारच दिवसात दोन हजार रुपयांनी वाढले आहेत. सध्या सोन्याचे दर हे 74600 वरून हे दर 76600 रुपयांच्या वर जाऊन पोहोचले आहेत. पुढील काळात सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जातेय.  


आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ


एका बाजूला राष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असताना दुसऱ्या बाजूला आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्या चांदीच्या दरात वाढ झाली आहे. त्यामुळं लोकांना सोन्याची खरेदी करणं परवड नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार पुढच्या काळात आमकी सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. आगामी काळात मौल्यवान धातूंच्या (सोने आणि चांदी) किंमती वाढू शकतात, असे जाणकारांचे मत आहे.  येत्या काही दिवसांत अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात केली जाऊ शकते, त्याचा फायदा सराफांना होऊ शकतो. लग्नसराईचा हंगाम सुरू झाल्याने येत्या काही दिवसांत देशांतर्गत बाजारात नवीन मागणी येऊ शकते. दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.


अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ


गेल्या अनेक दिवसापासून सोन्या चांदीच्या दरात वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. यामुळं खरेदीदारांच्या खिशाला मोठी झळ बसत आहे. वाढणारे सोन्या चांदीचे दर कधी कमी होणार असा सवाल नागरिक करत आहेत. दरम्यान, या वाढत्या दरामुळं सोन्या चांदीची खरेदी करण्याकडं नागरिक पाठ फिरवत आहेत.


महत्वाच्या बातम्या:


सोनं चांदी खरेदी करावं की नको? 48 तासात चांदीच्या किमतीत 7000 तर सोन्याच्या किमतीत 2000 रुपयांची वाढ