Pitru Paksha 2024 : हिंदू पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीपासून पितृ पक्षाचा (Pitru Paksha) सुरुवात होते. तर, अश्विन अमावस्येच्या दिवशी पितृपक्ष समाप्त होते. पितृ पक्षात 16 दिवस श्राद्ध, पूजा आणि तर्पण केलं जातं. असं म्हणतात की. पितृपक्षात पितर कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात असे मानले जाते. यावर्षी पितृपक्ष 17 सप्टेंबरला सुरू होऊन 28 सप्टेंबरपर्यंत आहे. 


ज्योतिष शास्त्रानुसार, पितृ पक्षाच्या दरम्यान काही गोष्टी करण्यास सक्त नकार दिला जातो. त्यामुळे जर या गोष्टींची काळजी घेतली नाही तर पितर नाराज होऊ शकतात. यासाठीच पितृ पक्षात नवीन वस्तू का खरेदी करु नयेत या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


शुभ कार्यास नकार दिला जातो


ज्योतिष शास्त्रानुसार, पितृ पक्षाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य केले जात नाही. धार्मिक ग्रंथात पितृ पक्षाच्या दरम्यान शुभ कार्य जसे की, लग्न, नवीन घर घेणे, गृहप्रवेश, लग्नाची श़पिंग आदी गोष्टीं करण्यास सक्त मनाई केली जाते. अशी मान्यता आहे की, या काळात पितर आपल्या वंशांशी आत्मिक भावाने जोडलेले असतात. त्यामुळे अशा वेळी पितरांचा आशीर्वाद घ्यावा. 


यासाठी शुभ कार्यास नकार देतात 


मान्यतेनुसार, या काळात वंशज आपल्या पितरांना आदराने त्यांची आठवण काढतात. या काळात नवीन वस्तूंची खरेदी करणे किंवा शुभ कार्य करणे एक प्रकारे उत्सवासारखे मानले जाते. यासाठीच अशा प्रकारची कार्य करणं वर्जित मानलं जातं.या काळत नवीन वस्तू खरेदी करणं म्हणजे पितरांचा अपमान करण्यासमान आहे. 


नवीन वस्तूंची खरेदी करु नये 


या काळात 16 दिवस वंशज आपल्या पितरांच्या प्रती आदर व्यक्त करतात. हा 16 दिवसांच्या कालावधीत पितरांना प्रसन्न केलं जातं. त्यासाठी पिंडदान, तर्पण आणि श्राद्ध गरणं गरजेचं आहे. या दरम्यान कोणतीही नवीन वस्तू जसे की घर, गाडी, सोनं चुकूनही खरेदी करु नये. तसेच, या काळात कोणतंही नवीन काम करणं वर्जित मानलं जातं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :


Pitru Paksha 2024 : पितृ पक्षात काय करावं आणि काय करु नये? वाचा A TO Z माहिती