नवी दिल्ली : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात घसरण झाली आहे. एमसीक्सवर सोने दरात घसरण झाली. MCX वर सोन्याची 10 ग्रॅमची किंमत आजचा दिवस सुरु झाला तेव्हा 77082 रुपये होती. सोन्याच्या दरात त्यानंतर 0.17 टक्क्यांची घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. नंतरच्या काळात 10 ग्रॅम सोन्याचे दर 77 हजार रुपयांच्या खाली घसरल्याचं पाहायला मिळालं.
आजपासून सुरु होणारा आठवडा सोने दरासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. कारण अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह ची या आठवड्यात बैठक होणार आहे. त्यापूर्वी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. सोने दरात आज घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर सोन्याचे 10 ग्रॅमचे दर 77 हजार रुपयांच्या खाली घसरले. यापूर्वीच्या कामकाजाच्या सत्राच्या शेवटी 10 ग्रॅम सोन्याच्या तुलनेत सोन्याचे दर 177 रुपयांनी घसरले 10 ग्रॅम सोन्याचा दर 76977 रुपयांपर्यंत घसरले होते. दुसरीकडे चांदीच्या दरात देखील घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. चांदीच्या दरात 0.18 टक्क्यांची घसरण झाली असून 163 रुपयांच्या घसरणीसह चांदीचा एक किलोचा दर 90838 रुपयांवर आहे.
अमेरिकेची मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्ह बँक 18 डिसेंबरला महत्त्वाची बैठक घेणार आहे. या बैठकीत व्याज दरांमध्ये एक चतुर्थांश किंवा 25 बेसिस पॉइंटच्या कपातीची अपेक्षा आहे. याशिवाय व्याजदरातील कपातीसंदर्भात देखील फेडरल रिझर्व्ह भाष्य करु शकते. त्यामुळं कमोडिटी मार्केटमध्ये गुंतवणूकदार सतर्क झाले असून त्यामुळं सोने दरात घसरण झाल्याचंही पाहायला मिळालं.
2024 मध्ये सोने दरात वाढ
2024 मध्ये सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांना चांगला फायदा झाला. जागतिक अनिश्चितता, व्याज दरातील कपात, केंद्रीय बँकांकडून होणारी सोने खरेदी यामुळं सोने दरात तेजी पाहायला मिळाली. 2024 मध्ये साधारणपणे 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. जागतिक सोने परिषदेनं त्यांच्या अहवालात सोन्यातील गुंतवणुकीतून 2025 मध्ये चांगला परतावा मिळण्याची शक्यता कमी असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळं सोने दरात वाढ होणार की नाही हे आगामी काळात पाहावं लागेल.
इतर बातम्या :
2024 मध्ये सरकारनं महिलांसाठी कोणत्या योजना सुरु केल्या? महिलांना खरच फायदा होतोय का?