मुंबई : जगप्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन (Ustad Zakir Hussain) यांचे वयाच्या 73 व्या वर्षी निधन झाल आहे. आज (16 डिसेंबर) सकाळी त्यांनी अमेरिकेतील रुग्णालात अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्तानंतर मनोरंजन, कला, राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, त्यांच्या निधनानंतर त्यांनी भारतीय तसेच जागतिक संगीत क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आठवण काढली जात आहे. त्यांना एकूण तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले होते. त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते.


जगप्रसिद्ध तबला वादक झाकीर हुसैन यांना हृदयासंबंधीचा त्रास चालू होता. त्यामुळे त्यांना अमेरिकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 9 मार्च 1951 रोजी मुंबईत झाला होता. त्यांचे वडील उस्ताद अल्लाह रक्खा हेदेखील प्रसिद्ध तबलावादक होते.  त्यांच्या आईचे बेगम असे होते. झाकीर हुसैन यांचे शालेय शिक्षण मुंबईतील माहीम येथील सेंट मायकल स्कूलमध्ये झालेले आहेत. त्यानंतर त्यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयात पदवीचे शिक्षण घेतले. पदवीचे शिक्षण घेत असतानाच ते तबलावादनामुळे देशभरात ओळखले जाऊ लागले. फक्त 11 वर्षांचे असताना झाकीर हुसैन यांनी अमेरिकेत एक कार्यक्रम सादर केला होता. तर वयाच्या 22 व्या वर्षी 1973साली झाकीर हुसैन यांचा ‘लिव्हिंग इन द मॅटेरियल वर्ल्ड’ नावाचा अल्बम आला होता. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनीदेखील झाकीर हुसैन यांच्या कामाची दखल घेत त्यांना व्हाइट हाऊसमध्ये होणाऱ्या ‘ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्ट'मध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले होते. 


41 व्या वर्षी मिळाला पहिला ग्रॅमी पुरस्कार 


झाकीर हुसैन हे उत्तम तबलावादक होते. त्यांनी तबलावादनासोबतच चित्रपट क्षेत्रातही मोठं काम केलं होतं. त्यांनी एक 12 चित्रपट केले. त्यांना 1988 साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. 1990 त्यांना संगीत नाट्य अकादमीच्या पुरस्काराने सन्मानित केले गेले.या वर्षी इंडो-अमेरिकन संगितात दिलेल्या योगदानामुळे त्यांना सन्मानित केलं गेलं. 1992 साली त्यांना ‘प्लॅलेनेट ड्रम अल्बम’साठी बेस्ट वर्ल्ड म्युझिक कॅटेगिरीत ग्रॅमी अवॉर्ड मिळाला. हा त्यांच्या करिअरमधील पहिला ग्रॅमी अवॉर्ड होता. हा पुरस्कार मिळाला तेव्हा ते अवघे 41 वर्षांचे होते. 2002 साली त्यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 


2024 साली मिळाले तीन ग्रॅमी अवॉर्ड्स 


2006 साली झाकीर हुसैन यांना मध्य प्रदेश सरकारकडून ‘कालिदास पुरस्कार’ मिळाला. 2009 साली ‘ग्लोबल ड्रम प्रोजेक्ट’ या अल्बममुळे दुसरा ग्रॅमी पुरस्कार मिळाला. 2012 साली कोणार्क नाट्य मंडपतर्फे त्यांना 'गुरु गंगाधर प्रधान' लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्ड मिळाला. 2019 साली झाकीर हुसैन यांना संगीत नाट्य अकादमीतर्फे ‘अकादमी रत्न पुरस्कार’ मिळाला. 2 वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठातर्फे त्यांना डॉक्टर ऑफ लॉ ही मानद पदवी प्रदान करण्यात आली. 2023 साली केंद्र सरकारने त्यांना पद्म विभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते.  


हेही वाचा :


Tabla Maestro Ustad Zakir Hussain Died: उस्ताद झाकीर हुसैन कालवश; अमेरिकेतील रुग्णालयात अखेरचा श्वास, कुटुंबीयांची माहिती


Zakir Hussain Death: भारतीय संगीतसृष्टीतील तालवाद्याचा जादूगार काळाच्या पडद्याआड, दातृत्व हरपलं; झाकीर हुसैन यांच्या निधनानंतर शोक व्यक्त