Gold Silver Price Today : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध गेल्या महिनाभराहून अधिक काळ सुरु आहे. याच दरम्यान आज भारतीय बाजारात सोन्या-चांदीचे दर नेमके काय आहेत ते जाणून घेणार आहोत. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर (MCX) सोने आणि चांदी या दोन्ही धातूंची घसरण सुरू केली. एमसीएक्सवर सोन्याचे फ्युचर्स दर 155 रुपयांनी घसरून 51,721 रुपये प्रति10 ग्रॅम झाला आहे. ही किंमत 24 कॅरेट शुद्ध सोन्याची आहे. 


सोन्या-चांदीचे आजचे दर : 


आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर (MCX) सोन्या-चांदीचे फ्युचर्स दर काहीसे कमी झालेले दिसत आहेत. आज 22 कॅरेट सोन्याचा दर 47,950 रूपये झाला आहे. दोन दिवसांपूर्वी हा दर 48,210 रूपये होता. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 51,721 रूपये झाला आहे. चांदीचा दरातसुद्धा काहीशी घसरण दिसून येत आहे. आज 1 किलो चांदीचा दर 68,520 रूपये आहे.     


जागतिक बाजारपेठेत वेगवान वाढ : 


जागतिक बाजारात सोन्या-चांदीच्या दरात काहीशी वाढ झाली आहे. सोन्याची स्पॉट किंमत 0.28 टक्क्यांनी वाढून $1,948.80 प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीचा स्पॉट रेट 0.70 टक्क्यांनी वाढून $25.44 प्रति औंस झाला. जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम भारतीय बाजारावर लवकरच दिसून येईल, अशी अपेक्षा आहे.


तुमच्या शहराचे दर तपासा :


तुम्ही घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस कॉल देऊन किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुम्हाला मेसेज येईल. 


खरेदी करण्यापूर्वी सोन्याची शुद्धता तपासा : 


तुम्ही सोने खरेदी करत असाल तर त्यापूर्वी त्याची शुद्धता नक्कीच तपासा. BIS CARE APP द्वारे तुम्ही कोणत्याही हॉलमार्क केलेल्या दागिन्यांची शुद्धता सहज तपासू शकता. यासाठी तुम्ही दागिन्यांचा HUID क्रमांक 'verify HUID' द्वारे तपासू शकता. याबरोबरच तुम्ही ISI मार्कने कोणत्याही वस्तूची शुद्धता देखील तपासू शकता.


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha